Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-25T09:43:22Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबईतील शाळांना १ ते २० नोव्हेंबर दिवाळी सुट्टी Rojgar News

Advertisement
मुंबई: मुंबईतील शाळांना दिवाळीसाठी १ ते २० नोव्हेंबर सुट्टी अखेर जाहीर झाली आहे. शिक्षण निरीक्षकांनी शाळांना १ ते २० नोव्हेंबर सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळीला अवघे दहा दिवस शिल्लक राहिले असतानाही मुंबईतील शाळांमध्ये सुट्ट्या जाहीर झाल्या नसल्याने पालक व शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्यातील अन्य विभागात शाळांना दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबईत मात्र शाळांकडून दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर झाल्या नसल्याने पालकांना दिवाळीच्या सुट्टीतले नियोजन करता येत नव्हते. करोनामुळे मागील दीड वर्षात अनेक पालक आपल्या गावी जाऊ शकले नाहीत आता करोना संसर्ग थोडा कमी झाल्याने अनेक पालक आपल्या मूळ गावी वा इतर ठिकाणी जाण्यासाठी तयारी करीत आहे त्यासाठी रेल्वेचे आरक्षण करणे गरजेचे आहे. मुंबईतील शिक्षकही करोना काळ असल्याने तसेच कोविड काळात करोना योद्धे म्हणून अनेक जबाबदारी असल्याने आपल्या मूळ गावी जाऊ शकले नाहीत. मुंबईतील जवळपास ७० टक्के शिक्षक दिवाळीनिमित्त आपल्या मूळ गावी जात असतात त्यासाठी गाड्यांचे आधीच आरक्षण करावे लागते मात्र शाळांकडून दिवाळीच्या सुट्या जाहीर न झाल्याने आरक्षण कसे करावे या चिंतेत मुंबईतील शिक्षक व पालक वर्ग होता. भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी २० ऑक्टोबर रोजी मुंबईचे शिक्षण उपसंचालक तसेच बृहन्मुंबई उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग शिक्षण निरीक्षकांकडे निवेदन पाठविले देऊन दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्याची मागणी केली होती व पाठपुरावा सुरू केला होता आज अखेर यासंदर्भातील आदेश शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्याने सुट्ट्यांचा घोळ मिटला असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vEDql3
via nmkadda