Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-10-02T17:43:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

School Reopening: अजित पवारांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या 'या' सूचना Rojgar News

Advertisement
Reopening 2021: सोमवारपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत केलेल्या सूचनांनुसार पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील शाळा सुरू करण्यासाठी सूचना जाहीर केल्या. पुण्यात झालेल्या बैठकीत पवार यांनी करोना संसर्गाचा धोका अजूनही पूर्णपणे टळला नसून, शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोव्हिड मार्गदर्शक सूचना आणि त्या अनुरूप वर्तणुकीची माहिती द्यावी आणि त्यानुसार नियमपालन करावे अशा सूचना द्याव्यात, असे निर्देशही दिले आहेत. ‘विद्यार्थ्यांना मास्क घालणे, शारीरिक अंतराचे पालन करणे आणि कोव्हिड संसर्गापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबत सातत्याने माहिती देण्यात यावी. वर्गातील बैठक व्यवस्थेतही सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन होईल याकडे लक्ष द्यावे. येत्या काळातील सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. नागरिकांकडूनदेखील मास्कचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,’ असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. या सूचनांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयुक्त पाटील यांनी शुक्रवारी आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये विविध मार्गदर्शक सूचनांचा अंतर्भाव आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविडची आरटीपीसीआर आणि अँटिजेन चाचणी नकारात्मक असणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या कर्मचाऱ्यांनाच कामावर हजर करून घेण्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय शाळा सुरू करण्यासाठी शंभर टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची करोना चाचणी तसेच लसीकरण होणे महत्त्वाचे आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र भरून घेणे आवश्यक करण्यात आले आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सरकारच्या अटींचे पालन करूनच शाळा सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे आदेशनात नमूद केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील आदेशान्वये आठवी ते बारावीचे वर्ग चार ऑक्टोबरपासून चालू करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या शाळांना सरकारच्या अटींचे पालन करून ही परवानगी देण्यात येत असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. शाळा सुरू करण्यासाठीच्या प्रमुख अटी - मार्गदर्शक सूचनांचे पालन बंधनकारक - स्वच्छता व निर्जंतुकीकरण सुविधा आवश्यक - वाहतूक सुविधांची पडताळणी आवश्यक - शिक्षक, कर्मचाऱ्यांना चाचणी प्रमाणपत्राचे बंधन - बैठक व्यवस्था सुरक्षित अंतराच्या नियमानुसार - शाळेच्या दर्शनी भागावर सूचनांचे स्टिकर्स - विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लेखी सहमती - शाळेतील स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण - विद्यार्थी वाहनांचे दोन वेळा निर्जंतुकीकरण


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l3fq7B
via nmkadda