
UPSC CDS II Admit cards 2021: यूपीएससी सीडीएस २ परीक्षेचे प्रवेश पत्र जारी Rojgar News
शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१
Comment

CDS II Admit cards 2021: सीडीएस २ परीक्षेसाठी हॉल तिकीट जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) शुक्रवार, २२ ऑक्टोबर रोजी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस,सीडीएस II(, CDS II) परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड अधिकृत वेबसाइट upsc.gov वर जारी करण्यात आले आहेत. जे उमेदवार ही परीक्षा देणार आहेत, त्यांनी पोर्टलवर आवश्यक माहिती भरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. यूपीएससी सीडीएस II परीक्षेसाठी हॉल तिकीट २०२१ अधिकृत वेबसाइट upsc.gov वर १४ नोव्हेंबर पर्यंत डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध राहील. त्यानंतर ती लिंक अधिकृत वेबसाइट वरून हटवली जाईल. यूपीएससी सीडीएस II परीक्षा १४ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित केली जाईल. UPSC CDS II 2021: अॅडमिट कार्ड असे करा डाऊनलोड सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जावे. यानंतर अॅडमिट कार्ड 2021 च्या लिंक वर क्लिक करा. आता यूपीएससीच्या विविध परीक्षांसाठी ई-प्रवेश पत्र लिंक वर क्लिक करा. सूचना नीट वाचा. आवश्यक माहिती भरून लॉगिन करा आणि रजिस्ट्रेशन आयडी किंवा रोल नंबर देऊन सबमिट करा. यानंतर सीडीएस २ प्रवेश पत्र २०२१ स्क्रीनवर दिसेल. ते नीट तपासून घ्या आणि डाऊनलोड करा. ही परीक्षा ३०० गुणांची असेल. उमेदवारांना तीन तासांचा वेळ असेल. प्रवेश पत्रावरील सूचना उमेदवारांनी नीट वाचून, समजून घ्याव्यात. एकूण ३३९ पदांसाठी ही भरती होणार आहे. परीक्षेसंबंधीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GcgWfX
via nmkadda
0 Response to "UPSC CDS II Admit cards 2021: यूपीएससी सीडीएस २ परीक्षेचे प्रवेश पत्र जारी Rojgar News"
टिप्पणी पोस्ट करा