AIBE १६ परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, १८ नोव्हेंबरपर्यंत नोंदवता येणार आक्षेप Rojgar News

AIBE १६ परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, १८ नोव्हेंबरपर्यंत नोंदवता येणार आक्षेप Rojgar News

XVI (16) : बार काऊन्सिल ऑफ इंडिया ( of India, ) ने ९ नोव्हेंबर रोजी AIBE XVI (१६) जाहीर केली आहे. बीसीआयने ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) ची उत्तरतालिकेसोबतच सर्व संचांची प्रश्नपत्रिका अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर अपलोड केली आहे. वेबसाइटवर आवश्यक तपशील भरुन अर्जदार निकाल तपासू शकतात. पुढे देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार AIBE Answer Key २०२१ डाउनलोड करू शकतात. AIBE XVI Answer key: अशी करा डाऊनलोड ऑल इंडिया बार परीक्षा उत्तरतालिका तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर जा. त्यानंतर 'AIBE उत्तरतालिका' वर क्लिक करा. त्यानंतर उत्तरतालिका डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी उत्तरतालिकेची प्रिंट घ्या उत्तर नीट तपासले गेले नाही असे उमेदवारांना वाटले तर ते त्यावर आक्षेप नोंदवू शकतात. यासाठी उमेदवारांना १८ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. या कालावधीत अर्जदार आपला आक्षेप नोंदवू शकतात. दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांची दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या. उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपांवर BCI चे तज्ञ पॅनेल पुनरावलोकन करेल आणि उत्तरतालिकेत आवश्यक ते बदल करण्यात येतील. त्यानंतर AIBE चा निकाल बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. AIBE १६ परीक्षेला सुमारे दीड लाख उमेदवार बसले होते. AIBE परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. तर परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देण्यास सांगण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bRcw0e
via nmkadda

0 Response to "AIBE १६ परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, १८ नोव्हेंबरपर्यंत नोंदवता येणार आक्षेप Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel