मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ १० डिसेंबर २०२१ ला Rojgar News

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ १० डिसेंबर २०२१ ला Rojgar News

मुंबई विद्यापीठाचा २०२१ चा वार्षिक दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या फोर्ट येथील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात शुक्रवार १० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. या दीक्षांत समारंभाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावरून होणार आहे. जे विद्यार्थी २०२१ मधील प्रथम तसेच व्दितीय सत्रामध्ये त्यांच्या परीक्षेत दीक्षांत समारंभाच्या दिवसापूर्वी म्हणजे १० डिसेंबर २०२१ पूर्वी उत्तीर्ण झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभानंतर पदवी / पदविका प्रमाणपत्रे त्यांच्या महाविद्यालयातुन वितरीत करण्यात येतील. यावर्षीच्या पदवी / पदविका प्रमाणपत्राची यादी लवकरच मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यातील आपले पदवी प्रमाणपत्र क्रमांक विद्यार्थ्यांनी शोधून आपल्या महाविद्यालयात सादर करावे म्हणजे महाविद्यालय आपणास आपले पदवी / पदविका प्रमाणपत्र वितरीत करेल असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. पदवी / पदविका प्रमाणपत्रे न मिळाल्यास किंवा त्यात काही त्रुटी आढळल्यास त्यासंबंधीची लेखी तक्रार दीक्षांत समारंभाच्या दिवसापासून एक महिन्याच्या आत विद्यानगरी येथील परीक्षा विभागात करावी असे प्रमाणपत्र विभागाचे उपकुलसचिव हिम्मत चौधरी यांनी सांगितले. २०२० या शैक्षणिक वर्षात मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समांरभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी पार पडला होता. या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,९१,४९५ विद्यार्थ्यांना पदवी /पदविका प्रदान करण्यात आल्या. यावर्षी २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी पदवी प्राप्त करतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31KdycC
via nmkadda

0 Response to "मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ १० डिसेंबर २०२१ ला Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel