Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-11-09T11:43:36Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IIT मद्रासमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची भरती Rojgar News

Advertisement
IIT Assistant Professor Recruitment 2021: अध्यापन क्षेत्रातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी चांगली संधी आहे. आयआयटी मद्रास (Indian Institute of Technology, ) मध्ये असिस्टंट प्रोफेसर पदांवर भरती सुरु करण्यात आली आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मद्रास प्राध्यापकांची ४९ पदे भरणार आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी IIT मद्रासची अधिकृत वेबसाइट iitm.ac.in च्या माध्यमातून ऑनलाइन नोटिफिकेशन तपासू शकतात. या पदांवर अर्ज करण्याची अंतिम मुदत २ डिसेंबर २०२१ आहे. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे, की अंतिम मुदत उलटल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. आयआयटी मद्रासने या भरतीसंबंधी नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार, केवळ एससी/एसटी/ओबीसी-एनसीएल/ईडब्ल्यूएस श्रेणीचे उमेदवारा या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पीएचडीधारक असणे अनिवार्य आहे. सोबतच संबंधित विषयातील चांगला अकॅडेमिक रेकॉर्ड असणेही आवश्यक आहे. वयोमर्यादा असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ३५ वर्षांहून कमी असावे आणि विशिष्ट प्रवर्गातील उमेदवारांना आपले वैध एससी / एसटी / ओबीसी-एनसीएल / ईडब्ल्यूएस आणि पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल. असा करा अर्ज उमेदवार आयआयटी मद्रासच्या अधिकृत वेबसाइट iitm.ac.in द्वारे अर्ज डाऊनलोड करू शकतात आणि अन्य माहितीसह अपलोड करू शकतात. अशी होणार निवड असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीसाठी बोलावलेल्या राज्याबाहेरच्या उमेदवारांना २ टीअर रेल्वे भाडे किंवा इकॉनॉमी श्रेणीच्या विमानभाड्याची प्रतिपूर्ती केली जाईल. भरती प्रक्रियेसंबंधीची अधिक माहितीसाठी अर्जदारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/305Qepm
via nmkadda