Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-11-09T11:43:34Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CTET परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट Rojgar News

Advertisement
CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे आयोजित केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) डिसेंबर २०२१ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रवेशपत्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जाऊ शकते. सीटीईटी २०२१ प्रवेशपत्र जाहीर करण्याची नेमकी तारीख आणि वेळ CBSE ने अद्याप जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांना ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येथे त्यांना प्रवेशपत्रासंबंधी अचूक माहिती मिळू शकणार आहे. बोर्डाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार प्रवेशपत्र कोणत्याही उमेदवाराला पोस्टाद्वारे पाठवले जाणार नाही. यासोबतच, उमेदवारांचे प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर खालील स्टेप्स फॉलो करुन ते डाऊनलोड करता येऊ शकते CTET Admit Card 2021: असे करा डाऊनलोड CBSE CTET परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर लॉगिन करा. त्यानंतर होमपेजवरील 'CTET December Admit Card' लिंकवर क्लिक करा. तुमचा CTET नोंदणी क्रमांक / अर्ज क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल भरा. ते सबमिट केल्यानंतर, तुमचे CBSE CTET २०२१ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. CTET पेपर १ उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवीला शिकवण्यास पात्र असतात. तर CTET पेपर २ उत्तीर्ण झालेले उमेदवार सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकविण्यासाठी पात्र ठरतात. उमेदवारांना अधिकृत पोर्टलवरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल. CTET ऑनलाइन (कॉम्प्युटर आधारित - CBT) माध्यमातून घेण्यात येणार आहे. आतापर्यंत ही परीक्षा ऑफलाइन माध्यमातून घेतली जात होती मात्र आता ती ऑनलाइन घेतली जात आहे. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, अर्जदारास भेट द्यावी लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kleSsS
via nmkadda