GATE 2022 परीक्षेच्या तीन केंद्रात बदल; दुरुस्तीसाठी विंडो उघडली Rojgar News

GATE 2022 परीक्षेच्या तीन केंद्रात बदल; दुरुस्तीसाठी विंडो उघडली Rojgar News

गेट २०२२ साठी अर्जात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या परीक्षेचे यजमानपद असणाऱ्या आयआयटी खरगपूरने ४ परीक्षा केंद्रांची शहरे काढून टाकली आहेत. सोनेपत, पानिपत आणि इडुक्की अशी तीन ठिकाणची परीक्षा केंद्रे यंदा असणार नाहीत. अधिक माहिती gate.iitkgpcac.in या संकेतस्थळावर मिळेल. गेट २०२२ परीक्षा केंद्रांची शहरे उमेदवारांनी नोंदणीच्या वेळीच भरायची होती. आयआयटी खरगपूरने यासंदर्भात ताजी अपडेट जारी केली आहे. सोनेपत, पानीपत आणि इडुक्की ही तीन शहरे यादीतून काढन टाकण्यात आली आहेत. यानुसार उमेदवारांना त्यांच्या अर्जात दुरुस्ती करण्यास सांगितली आहे. उमेदवार या परीक्षा केंद्रांच्या शहरात कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बदल करू शकणार आहेत. ही परीक्षा केंद्रांची शहरे यादीतून का वगळण्यात आली त्याबाबतचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रांच्या पसंतीक्रमात यानुसार बदल करण्यास सांगण्यात आला आहे. अर्ज दुरुस्ती विंडो बंद होण्याआधी उमेदवारांनी परीक्षा केंद्रांच्या शहरांमध्ये बदल करायचा आहे. हा बदल करण्यास १२ नोव्हेंबरपर्यंतचा अवधी आहे. आयआयटी खरगपूरच्या नियमांनुसार, उमेदवार पुढील माहितीत बदल करू शकतात - नाव, जन्मतारीख, लिंग, प्रवर्ग, पेपर आणि अन्य तपशील यात दुरुस्ती करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mZTM4M
via nmkadda

0 Response to "GATE 2022 परीक्षेच्या तीन केंद्रात बदल; दुरुस्तीसाठी विंडो उघडली Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel