Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-11-09T10:43:47Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE: दहावी, बारावी टर्म १ परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

Advertisement
Admit Card: CBSE टर्म १ परीक्षा २०२२ चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षा १७ नोव्हेंबर आणि बारावीच्या परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांची प्रवेशपत्र ९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रवेशपत्राव्यतिरिक्त, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जाहीर केली जाणार आहेत. दहावी आणि बारावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर अधिक माहिती मिळवू शकतात. सीबीएसई टर्म १ परीक्षा २०२२ चे प्रवेशपत्र शाळांच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केले जातील. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांच्या पोर्टलवर प्रवेशपत्र मिळू शकेल. याशिवाय सेल्फ सेंटर आणि परीक्षा केंद्रांबाबतही बोर्डातर्फे सविस्तर माहिती दिली जाणार आहे. वेळापत्रकानुसार, टर्म १ ची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये होणार आहे. इयत्ता दहावीची पहिली परीक्षा १७ नोव्हेंबरपासून तर बारावीची परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दहावी, बारावी या दोन्ही मुल्यांकनासाठी बोर्ड परीक्षेत ओएमआर वापरण्याची ही पहिलीच वेळ असेल. या संदर्भात सीबीएसईने अधिकृत वेबसाइटवर ओएमआरची नमुना प्रत देखील जाहीर केली आहे. ज्यामध्ये ओएमआर कसा भरायचा आणि कोणते बॉक्स भरायचे आहेत याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. शाळांना परीक्षेच्या वेळापत्रकानुसार ओएमआर शीट अगोदर डाउनलोड करावी लागेल. शीट डाऊनलोड केल्यानंतर केंद्र अधीक्षक ओएमआर सुरक्षितपणे ठेवतील आणि परीक्षेच्या दिवशी त्याचा वापर केला जाईल. CBSE टर्म १ प्रवेशपत्रासंबंधी महत्त्वाचे अपडेट प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी CBSE टर्म १ प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या परीक्षेच्या दिवसाच्या सूचना वाचल्या पाहिजेत. प्रवेशपत्रामध्ये नाव, रोल नंबर, परीक्षा केंद्र, शाळेचे नाव इत्यादी तपशील असतील. केंद्रापर्यंत पोहोचण्याआधी तुम्हाला हे वाचणे गरजेचे आहे. CBSE टर्म १ परीक्षा ही भारतातील २६ हजार संलग्न शाळांमध्ये आणि २६ देशांमध्ये घेतली जाणार आहे. महत्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांचा तपशील ओएमआरमध्ये भरला जाईल. विद्यार्थ्याने ओएमआर शीटवर दिलेल्या जागेत वरच्या उजव्या कोपर्‍यात प्रश्नपत्रिकेचा कोड लिहायचा आहे. प्रश्नपत्रिकेवर प्रश्नपत्रिका कोड दिलेला असेल. 'वर दिलेले सर्व तपशील बरोबर आहेत असे लिहून ओएमआरवर सही करा. माहिती भरण्यासाठी आणि अभिप्राय देण्यासाठी फक्त निळ्या किंवा काळ्या बॉल पॉइंट पेनचा वापर करावा. पेन्सिल वापरण्यास सक्त मनाई आहे. ओएमआर भरण्यासाठी विद्यार्थ्याने पेन्सिलचा वापर केल्याचे आढळून आल्यास, तो अनुचित मार्गाचा वापर मानला जाईल. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YwYQEA
via nmkadda