शुल्क प्रस्तावांसाठी कॉलेजांना मुदतवाढ Rojgar News

शुल्क प्रस्तावांसाठी कॉलेजांना मुदतवाढ Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेजांना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या शुल्करचना निर्धारणासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव सादर करण्यास शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार महाविद्यालयांना ३१ डिसेंबरपर्यंत 'एफआरए'कडे प्रस्ताव सादर करता येणार आहे. राज्यातील विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या शुल्करचना निर्धारणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास यापूर्वी ३१ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली होती. पूर्वीच्या समितीचा कार्यकाळ मार्च २०२१ मध्ये संपल्यामुळे कामकाजात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे साधारण तीन महिने समितीच्या कामकाजात खंड पडला. त्यानंतर राज्य सरकारने १८ जूनला नवीन समितीची नियुक्ती केली. नव्या समितीच्या सदस्यांकडून २०१९-२० ते २०२१-२२ या कालावधीतील प्रलंबित असलेले शुल्काचे प्रस्ताव अंतिम करण्याचे काम करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील शिक्षण संस्थांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करता येणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C12VOZ
via nmkadda

0 Response to "शुल्क प्रस्तावांसाठी कॉलेजांना मुदतवाढ Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel