Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-11-09T08:43:57Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

एसबीआय पीओ पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

Advertisement
Prelims 2021: स्टेट बॅंक ऑफ इंडियाने पीओ पूर्व परीक्षेसाठी हॉल तिकीट जाहीर केले आहे. २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या परीक्षेचे प्रवेशपत्र एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर आवश्यक तपशील भरल्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. एसबीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्व परीक्षा २०,२१ आणि २७ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. पूर्व परीक्षेत १०० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. ज्यामध्ये इंग्रजी भाषा, परिमाणात्मक योग्यता आणि तर्क क्षमता हे ३ विभाग असतील. परीक्षा ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. पुढील स्टेप्स फॉलो करुन उमेदवार आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. SBI PO Admit 2021: असे करा डाऊनलोड SBI PO प्रिलिम्स परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जावे. आता होम पेजवर उपलब्ध असलेल्या करिअर पेज लिंकवर क्लिक करा. होम पेजवर उपलब्ध असलेल्या एसबीआय पीओ प्रीलिम्स अॅडमिट कार्ड २०२१ लिंकवर क्लिक करा. लॉगिन तपशील भरा सबमिटवर क्लिक करा. यानंतर तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. प्रवेशपत्र तपासा आणि ते डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रवेशपत्राची प्रिंट ठेवा. पूर्व परीक्षेमध्ये निवडलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसता येईल. या रिक्त पदांद्वारे एकूण २०५६ पदांची भरती (SBI PO Recruitment 2021)केली जाईल.एसबीआयने जाहीर केलेल्या प्रोबेशनरी ऑफिसर भरती नोटिफिकेशननुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच १ एप्रिल २०२१ रोजी उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल. पदभरतीचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदांवरील नियुक्त्या तीन टप्प्यातील परीक्षेद्वारे केल्या जातील. यामध्ये प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत परीक्षांचा समावेश आहे. सध्या २० नोव्हेंबरपासून पूर्वनपरीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसता येणार आहे. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3F1Ko6S
via nmkadda