Advertisement

Bank of Baroda : बँकेत सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदातर्फे वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस विभागात सिनीअर रिलेशनशीप मॅनेजर (Senior Relationship Manager) आणि ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर (E Wealth Relationship Manager) पदांची भरती होणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. बँकेने प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीनुसार, दोन्ही पदांसाठी एकूण ३७६ पदांची भरती केली जाणार आहे. ज्यामध्ये सिनीअर रिलेशनशीप मॅनेजर पदाच्या ३२६ लाजा आणि ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदांच्या ५० जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. या पदाचा कालावधी ५ वर्षांसाठी असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट वाढवताना उमेदवारांच्या कामगिरीचे पुनरावलोकन केले जाणार आहे. याप्रमाणे करा अर्ज या पदासाठी इच्छुक उमेदवारांना बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जावे लागेल. होमपेजवरील करिअर सेक्शनमध्ये जाऊन अर्ज भपता येणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १९ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाली असून उमेदवार ९ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज भरू शकतील. ऑनलाइन अर्जादरम्यान, उमेदवारांना ६०० रुपये शुल्क देखील भरावे लागेल. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. बँक ऑफ बडोदाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, वरिष्ठ रिलेशनशीप मॅनेजर पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून पदवीधर असणे गरजेचे आहे. उमेदवाराला संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराचे वय १ नोव्हेंबर २०२१ रोजी २४ वर्षांपेक्षा कमी आणि ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याचप्रमाणे ई-वेल्थ रिलेशनशीप मॅनेजर पदांसाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून पदवी तसेच संबंधित कामाचा दीड वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराचे वय २३ वर्षांपेक्षा कमी आणि ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xgX0Vf
via nmkadda