Career Tips: उत्तम नोकरीसाठी पर्सनालिटीमध्ये 'असा' करा बदल Rojgar News

Career Tips: उत्तम नोकरीसाठी पर्सनालिटीमध्ये 'असा' करा बदल Rojgar News

Development: प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे व्यक्तिमत्व असते. आजच्या काळात चांगलं व्यक्तिमत्व असणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही नोकरीत असाल, व्यवसायात असाल किंवा विद्यार्थी असाल. चांगले व्यक्तिमत्व म्हणजे काय? कोणते गुण असावेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. तुम्हाला उत्तम नोकरी मिळवायची असेल तर नोकरीच्या स्किल्ससोबतच तुमचं व्यक्तीमत्व कसं आहे? याकडेही लक्ष दिलं जातं. तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलात, तर तुमची बोलण्याची पद्धत, तुमची वागणूक या सर्व गोष्टी बघितल्या जातात. त्या आधारे तुम्हाला नोकरी दिली जाते. तसेच कार्यालयात काम करतानाही तुम्ही सहकाऱ्यांशी कसे वागता यावरुन व्यक्तिमत्व ठरत असते. महत्वाच्या टिप्स कोणत्याही क्षेत्रातत करिअर करताना स्वत: ची जागरूकता असणे खूप महत्वाचे आहे. आपल्या क्षेत्रातमध्ये सध्या काय घडामोडी घडतायत? याची माहिती आपल्याला असायला हवी. यामुळे आपल्याला समोरच्यांशी संवाद साधताना मदत होते. इतरांबद्दल निर्णय घेण्यापेक्षा स्वत: च्या जागरूकतेवर काम करणे कधीही योग्य ठरते. कोणतेही काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहायला हवे. कोणतेही काम करताना स्वत:ला सर्वोत्तम कामगिरी करण्यास पात्र बनवणे गरजेचे आहे. स्वत:ची क्षमता ओळखणे आणि शक्य असल्यास आपली क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुमचे वर्तन हा तुमच्या व्यक्तिमत्व विकासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याकडे सर्वांचे लक्ष असते. त्यामुळे वर्तन आणि सादरीकरण कौशल्ये सुधारायला हवीत. नेहमी तंदुरुस्त राहिल्याने सकारात्मकता विचार येण्यास मदत होते. त्यामुळे शरीर आणि मनाची निगा राखणे व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचे ठरते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C5U7aw
via nmkadda

0 Response to "Career Tips: उत्तम नोकरीसाठी पर्सनालिटीमध्ये 'असा' करा बदल Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel