Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ११, २०२१ WIB
Last Updated 2021-11-11T10:43:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

बारावी परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेसंदर्भात शिक्षणविभागाकडून महत्वाची अपडेट Rojgar News

Advertisement
Application forms:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सुरु होणार आहे. शालेय शिक्षणविभागातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. बारावी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन http://mahahsscboard.in अर्ज करायचा आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांतील नियमित विद्यार्थ्यांना सरल डेटाबेसच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १२ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर १३ डिसेंबर २०२१ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसायिक अभ्यासक्रम (vocational Course) शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनरपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी खासगी आणि तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया ३ डिसेंबर ते ११ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या विद्यार्थ्यांना २० डिसेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. तसेच उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करु शुल्क भरण्यासाठी १२ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन सबमीट केल्यानंतर त्यांना कॉलेज लॉगिनमधून प्रीलिस्ट उपलब्ध करुन दिली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती रजिस्टारसोबत पडताळण्यात यावी. माहिती अचूक असल्याची खात्री करावी आणि विद्यार्थ्यांची सही घ्यावी असे निर्देश शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आणि आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन स्वतंत्र चलनाद्वारे शुल्क भरावे. शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बॅंक खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत आणि विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत संबंधित विभागाकडे सादर कराव्या अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YENq1E
via nmkadda