अकरावीसाठी पुन्हा विशेष फेरीचा घाट Rojgar News

अकरावीसाठी पुन्हा विशेष फेरीचा घाट Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक शहरांमधील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने प्रवेशासाठी आणखी एका फेरीचा घाट घालण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी अजूनही विचारणा होत असल्याने नव्याने आणखी एक फेरी राबविण्याची चाचपणी शालेय शिक्षण विभागाकडून केली जात आहे. या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे संकेत विभागाने दिले आहेत. राज्यात अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी संपल्याने ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे माध्यमिक शिक्षण संचालनालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) अशा स्वरूपात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. अकरावीतील प्रवेशासाठी पुणे-मुंबईसह नागपूर, नाशिक आणि अमरावती येथे एक हजार ४९७ ज्युनिअर कॉलेज उपलब्ध आहेत. येथील पाच लाख ३५ हजार ७१० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणे शक्य होते. परंतु, उपलब्ध जागांपैकी केवळ तीन लाख ६४ हजार १३४ विद्यार्थ्यांनीच आतापर्यंत प्रवेश निश्‍चित केले आहेत. त्यामुळे अजूनही एक लाख ७१ हजार ५७६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात अकरावी प्रवेशासांठी अजूनही ३९ हजार ६६३ जागा रिक्त आहेत. आज, गुरुवारपासून (११ नोव्हेंबर) शहर आणि परिसरातील ज्युनिअर कॉलेजे पुन्हा सुरू होणार आहेत. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मात्र, कॉलेजचे द्वितीय सत्र सुरू झाले, तरी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया संपत नसल्याचे चित्र यंदा दिसून येत आहे. प्रवेश न होण्याची कारणे - करोनामुळे विस्कटलेली अर्थिक घडी - ऑनलाइन शिक्षणाचा अवलंब - सातत्याने वाढणारे शैक्षणिक शुल्क - ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचा शहरात शिक्षणासाठी येण्यास नकार अकरावी प्रवेशांची स्थिती १,१३,३२५ -- एकूण उपलब्ध जागा ९०,४५२ -- नोंदणी केलेले विद्यार्थी ७३,६६२ -- प्रवेश घेणारे विद्यार्थी ३९,६६३ -- रिक्त जागांची संख्या


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3krcot8
via nmkadda

0 Response to "अकरावीसाठी पुन्हा विशेष फेरीचा घाट Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel