Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ११, २०२१ WIB
Last Updated 2021-11-11T09:43:32Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET 2021: एनटीएकडून ओएमआर शीटची स्कॅन कॉपी जाहीर Rojgar News

Advertisement
NEET 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सी () ने राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा नीट यूजी २०२१ (NEET UG 2021) च्या ओएमआर शीटची स्कॅन कॉपी जाहीर केली आहे. एनटीएद्वारे जाहीर केलेल्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, 'ओएमआर उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली प्रत न मिळालेल्या उमेदवारांकडून विनंत्या प्राप्त झाल्यानंतर, आता नीट यूजीच्या ओएमआर उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात. तसेच बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलोकरुन डाऊनलोडदेखील करु शकतात. एनटीएने आधीच उमेदवारांना ओएमआर उत्तरपत्रिका पाठवली आहे. नीट यूजी २०२१ चा निकाल १ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर झाला. यावर्षी १६ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. या परीक्षेत तेलंगणाच्या मृणाल कुटेरीने ७२० पैकी ७२० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. OMR शीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवार महत्त्वाच्या तारखा आणि स्टेप्स येथे पाहू शकतात. NEET UG 2021: OMR शीट डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट-neet.nta.nic.in ला भेट द्या. आता "NEET (UG) 2021 OMR DISPLAY" या नोटिफिकेशनवर क्लिक करा. एक नवीन विंडो उघडेल. उमेदवारांनी अर्ज क्रमांक आणि पासवर्ड यांसारख्या क्रेडेन्शियल्ससह लॉगिन करा. यानंतर स्क्रीनवर दिसेल. उमेदवार ओएमआर शीट डाउनलोड करण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करू शकतात. उमेदवार १४ नोव्हेंबर रात्री ९ वाजेपर्यंत ओएमआर शीट पाहू शकतील. उमेदवारांना काही शंका असल्यास त्यांनी हेल्पलाइन क्रमांक-०११-४०७५९००० वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी उमेदवार मेल id-neet@nta.ac.in वर देखील लिहू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n33nrz
via nmkadda