Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ११, २०२१ WIB
Last Updated 2021-11-11T08:43:50Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

यूपीएससीतर्फे एनडीए आणि एन २ परीक्षेसाठी महत्वाचे निर्देश Rojgar News

Advertisement
NDA 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) नॅशनल डिफेन्स अॅकेडमी (NDA) आणि नौदल अॅकेडमी (NA) परीक्षा (२) ही १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासंदर्भात परीक्षा केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन परीक्षा केंद्राचा तपशील पाहू शकतात. तसेच या परीक्षेत पहिल्यांदाच महिला उमेदवार सहभागी होत आहेत. या शहरांमध्ये परीक्षा केंद्रे आगरतळा, अहमदाबाद, आयझॉल, प्रयागराज (अलाहाबाद), बंगळूर, बरेली, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, कटक, देहरादून, दिल्ली, धारवाड, दिसपूर, गंगटोक, हैदराबाद, इंफाळ, इटानगर, जयपूर, जम्मू, जोरहाट, कोची, कोहिमा, कोलकाता , लखनौ, मदुराई, मुंबई, नागपूर, पणजी (गोवा), पाटणा, पोर्ट ब्लेअर, रायपूर, रांची, संबलपूर, शिलाँग, शिमला, श्रीनगर, तिरुवनंतपुरम, तिरुपती, उदयपूर आणि विशाखापट्टणम या शहरांमध्ये परीक्षा केंद्रे असणार आहेत. यूपीएससीने १४ नोव्हेंबर २०२१ रोजी होणाऱ्या (२) २०२१ च्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर केले आहेत. करोना संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी कठोर प्रोटोकॉल लागू करण्याचे निर्देश यूपीएससीने दिले आहेत. एनडीए आणि एनए २ परीक्षेसाठी पुढील सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्व उमेदवारांसाठी मास्क/फेस कव्हर घालणे अनिवार्य आहे. मास्क/फेस कव्हर नसलेल्या उमेदवारांना केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा अधिकाऱ्यांना पडताळणी करतानाच उमेदवारांना त्यांचे फेस मास्क काढावे लागतील. उमेदवार पारदर्शक लहान आकाराच्या बॉटलमध्ये स्वतःचे हॅण्ड सॅनिटायझर घेऊन जाऊ शकतात. उमेदवारांनी करोना प्रतिबंध प्रोटोकॉलचे पालन करून परीक्षा हॉल/खोल्यांमध्ये तसेच केंद्राच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग तसेच वैयक्तिक स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक सत्रात ई प्रवेशपत्रासोबत (मूळ) फोटो ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल. फोटो अस्पष्ट असल्यास किंवा ई-प्रवेशपत्रावर उपलब्ध नसल्यास, उमेदवारांना दोन सारखे फोटो (प्रत्येक सत्रासाठी एक फोटो) बाळगण्याची सूचना करण्यात आली आहे. ई प्रवेशपत्रामध्ये काही चूक आढल्यास अधिकृत वेबसाइट usnda-upsc@nic.in या ई-मेल आयडीवर तत्काळ आयोगाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n2dHQQ
via nmkadda