Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १८, २०२१ WIB
Last Updated 2021-11-18T07:43:08Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE, ICSE टर्म १ परीक्षांसंबंधी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी Rojgar News

Advertisement
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) आणि काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE)च्या टर्म 1 परीक्षांसाठी ऑनलाइन देण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. ही याचिका सीबीएसई आणि आयसीएसईच्या सहा विद्यार्थ्यांद्वारे दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत असे म्हटले आहे की, सीबीएसई आणि आयसीएसीद्वारे आयोजित टर्म १ परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना केवळ ऑफलाइन परीक्षांचा पर्याय दिला आहे. कोविड-१९ मुळे ऑनलाइन परीक्षा देण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांना द्यायला हवा. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत पुढे असं म्हटलं आहे की 'ऑफलाइन परीक्षेमुळे कोविड-१९ विषाणू संक्रमणाचा धोका अधिक आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षांचा पर्यायही दिला जायला हवा. हायब्रीड मोडवर जर या परीक्षांचं आयोजन केलं गेलं, तर सोशल डिस्टन्सिंगही पाळलं जाईल.' या याचिकेवर कोर्टात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. सीबीएसईच्या परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत तर आयसीएसईच्या परीक्षा २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या याचिकेमुळे परीक्षेचा अभ्यास करणारे इतर विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे साऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oHFW6O
via nmkadda