Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १८, २०२१ WIB
Last Updated 2021-11-18T06:43:51Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५ हजार पदांची भरती, अंतिम निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
SBI Recruitment 2021: (SBI) ने देशभरातील विविध ब्रांचमध्ये ज्युनिअर असोशिएटच्या ५ हजार पदांच्या भरतीसाठी निवड प्रक्रिया आयोजित केली. या निवड प्रक्रियेअंतर्गत एसबीआयतर्फे पहिल्या टप्प्यात १७ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत प्राथमिक परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांसाठी १ ते ७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यानंतर एसबीआयने १७ नोव्हेंबर २०२१ रोजी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला. यासोबतच एसबीआयने मुख्य परीक्षेतील कामगिरीच्या आधारे सर्व उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. या उमेदवारांना नियुक्तीसाठी पात्र घोषित करण्यात आले आहे. या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, इतर औपचारिकता आणि प्रशिक्षणानंतर त्यांना लिपिक पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे. एसबीआय लिपिक अंतिम निकाल 'असा' तपासा एसबीआय लिपिक मुख्य परीक्षा २०२१ मध्ये बसलेले उमेदवार त्यांचा निकाल बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर पाहू शकतात. बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकवर क्लिक करुन देखील उमेदवार आपला निकाल पाहू शकतात. यानंतर नियुक्तीसाठी अनौपचारिकपणे निवडलेल्या सर्व उमेदवारांच्या रोल नंबरची यादी पीडीएफ स्वरूपात पाहता येणार आहे. या पीडीएफमध्ये उमेदवार त्यांचा रोल नंबर शोधू शकतात. मुख्य परीक्षेच्या आधारे अंतिम निवड यादीएसबीआय द्वारे जाहीर करण्यात आलेल्या लिपिक भरती २०२१ च्या नोटिफिकेशननुसार, उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारावर करण्यात आली आहे. प्राथमिक परीक्षेतील गुण यामध्ये जोडण्यात आले नाही. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक संवर्गातील ज्युनिअर असोशिएट पदांच्या एकूण ५ हजार रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २७ एप्रिल ते २० मे २०२१ पर्यंत सुरु होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kPCMgf
via nmkadda