Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-11-15T13:43:49Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE आणि ICSE टर्म १ परीक्षेसंदर्भात SC मध्ये काय झालं? वाचा... Rojgar News

Advertisement
and CISCE Term 1 examinations: सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. दोन्ही बोर्डाच्या सहा विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. टर्म १ च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने बसण्याचा पर्याय देण्यात यावा आणि परीक्षा हायब्रीड पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. आज सुनावणी होणार होती सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) आणि काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ICSE)बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या टर्म परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर १५ नोव्हेंबर रोजी सुनावरणी होणार होती. दोन्ही केंद्रीय बोर्डांच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये टर्म १ च्या परीक्षेत बसण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. पण आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सीबीएसई आणि आयसीएसई दहावी आणि बारावी टर्म परीक्षा केवळ ऑफलाइन माध्यमातून होण्याच्या निर्णयाविरोधात दहावी, बारावीच्या ६ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही परीक्षा हायब्रीड पद्धतीने घेण्याबाबत तातडीने निर्देश देण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली आहे. सीबीएसईच्या परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत तर आयसीएसईच्या परीक्षा २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या याचिकेमुळे परीक्षेचा अभ्यास करणारे इतर विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे साऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. ऑफलाइन परीक्षेमुळे करोना संसर्गाचा धोका झपाट्याने वाढेल आणि हे आरोग्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे असे याचिकेत म्हटले आहे. परवानगी घेतल्याशिवाय ऑफलाइन परीक्षांना बोलावणे हे मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचे याचिकेमध्ये म्हटले आहे. हायब्रीड माध्यमातून परीक्षा घेणे ही काळाची गरज आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल आणि यंत्रणांवर पडणारे ओझे देखील कमी होईल असे यामध्ये याचिकेत म्हटले आहे. डिसेंबर २०२१ मध्ये प्रमुख विषयांच्या परीक्षा तीन आठवडे असणार आहेत त्यामुळे याचिकाकर्त्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यानंतर परीक्षांवर पडणाऱ्या परिणामाबद्दल प्रचंड भीती वाटते. डिसेंबर २०२१ मध्ये प्रमुख विषयांच्या परीक्षेपूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये ऑफलाइन माध्यमातून इतर विषयांच्या परीक्षा आहेत. चुकीची माहिती आणि बळजबरी करून संमती मिळवली जात असल्याचे मत अनेक विद्यार्थ्यांनी नोंदविल्याचे याचिकेमध्ये म्हटले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qFc0eo
via nmkadda