TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

IGNOU च्या यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ Rojgar News

July Admissions 2021: इग्नूतर्फे जूलै २०२१ सत्राच्या प्रवेशासाठी अद्याप अर्ज केला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. इग्नुने यूजी आणि पीजी अभ्यासक्रमाच्या अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना अधिकृत वेबसाइट gnou.ac.in वर जाऊन २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. इग्नुतर्फे केवळ यूजी आणि पीजी कोर्सेसच्या अर्ज प्रक्रियेलाच मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात इग्नूतर्फे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार यूजी आणि पीजी कोर्सच्या प्रवेशासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. इग्नूतर्फे ट्विटरवर देखील ही माहिती शेअर करण्यात आली आहे. असा करा अर्ज अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम ignou.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. सर्वप्रथम येथे नोंदणी करा. नोंदणी झाली असेल तर क्रेडेन्शियल्स टाकून लॉगिन करा. अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा. आता अर्ज भरा. फी जमा करा आणि मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा. शेवटी अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत तुमच्याकडे ठेवा. महत्वाची माहिती ओडीएल प्रोग्राममध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट ignouadmissions.samarth.edu.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ignouiop.samarth.edu.in ला भेट द्यावी लागेल. नोंदणीच्या वेळी आकारले जाणारे शुल्क म्हणजेच नोंदणी शुल्क परत करण्यायोग्य नाही. तुम्ही प्रवेश घ्या किंवा न घ्या, ही फी परत केली जाणार नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी कोर्सची योग्य माहिती मिळवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3neBH3i
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या