TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CBSE: परीक्षेदरम्यान रेशन वितरण आणि लसीकरण प्रक्रिया राहणार बंद Rojgar News

CBSE Exam: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) टर्म १ परीक्षेदरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील कामे बंद ठेवली जाणार आहेत. दिल्लीच्या शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात नोटीस जाहीर केली आहे. बारावीची परीक्षा १६ नोव्हेंबरपासून, दहावीच्या मायनर विषयांची परीक्षा १७ नोव्हेंबरपासून आणि ३० डिसेंबरपासून दहावीच्या आणि बारावीच्या मुख्य परीक्षा होणार आहेत. यासोबतच १ डिसेंबरपासून नववी आणि अकरावीची मिड टर्म परीक्षा होणार आहे. शाळांमध्ये बोर्ड परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यादृष्टीने शाळांना महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. संचालनालयाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिलेल्या निर्देशानुसार, परीक्षेच्या काळात कोणत्याही शाळेत शिधावाटप केंद्र सुरु राहणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच परीक्षेदरम्यान लसीकरण केंद्रे देखील बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डाची परीक्षा सुरु असताना शाळा परीसरात कोणतेही सार्वजनिक उपक्रम घेण्यात येऊ नयेत. यासोबतच शाळेच्या आवारात मास्क, सॅनिटायझरची पुरेशी सोय असले याचीही मुख्याध्यापकांना खात्री करावी लागेल असे निर्देश देण्यात आले आहेत. बारावीची टर्म १ ची परीक्षा इंटरप्रिन्योरशिप, ब्युटी आणि वेलनेस या पेपरने सुरू होईल. तर दहावीची परीक्षा पेंटिंगच्या पेपरसह सुरू होईल.नसीबीएसईने टर्म १ च्या परीक्षांसाठी अनेक सूचना जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांना या सूचनांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. CBSE बोर्ड टर्म १ च्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या किमान १ तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचले पाहिजे. हिवाळा असल्यामुळे सर्व परीक्षा सकाळी ११.३० वाजता सुरू होतील. विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये आधीच्या १५ मिनिटांऐवजी २० मिनिटे वाचनासाठी वेळ मिळेल. परीक्षेच्यावेळी सीबीएसई दहावी/बारावीचे प्रवेशपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी मास्क घालावे, सॅनिटायझर बाळगावे आणि संसर्गाचा संभाव्य प्रसार टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळावे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांनी ओएमआर शीट भरताना स्वतःची ओळख पटवून द्यावी. विद्यार्थी करोनामुळे, कोणत्याही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड, आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी असल्याने परीक्षेत बसू शकत नसेल तर त्यांनी तातडीने त्यांच्या शाळेत कळवावे. जेणेकरुन आवश्यक कार्यवाही करता येईल. बोर्ड परीक्षेचा अंतिम निकाल टर्म २ परीक्षा संपल्यानंतरच जाहीर केला जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Fc4uvw
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या