Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-11-16T09:43:30Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आयुष मंत्रालयात नोकरी मिळवण्याची संधी, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
Ayush Ministry : आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीमध्ये पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ही शैक्षणिक पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना आयुष मंत्रालयातर्फे विविध पदांवर काम करण्याची संधी आहे. या अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रोग्राम मॅनेजर या पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या पदभरती संदर्भात आयुष्य मंत्रालयातर्फे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पगार, अनुभव, वयोमर्यादा यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. शैक्षणिक पात्रता डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी या विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय प्रोग्राम मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये एमबीए, एमबीए फायनान्स/एम.कॉम पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे कॉम्प्युटर अॅप्लिकेशन/आयटीचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा प्रोग्राम मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ५० वर्षे असावे. तसेच डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ४० वर्षे असणे आवश्यक आहे. याशिवाय राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेमध्ये सवलत दिली जाणार आहे. अंतिम मुदत या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी पत्ता अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर अर्ज भरुन औषध धोरण विभाग, आयुष मंत्रालय, NBCC, ऑफिस ब्लॉक III, दुसरा मजला, पूर्व किडवाई नगर, नवी दिल्ली-११००२३ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. वेबसाइटला भेट द्या अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज प्रक्रिया किंवा भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kG7U1U
via nmkadda