Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-11-16T09:43:34Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ITI नंतर करिअरचे कोणते आहेत पर्याय? Rojgar News

Advertisement
नंतर डिप्लोमा धारक उच्च शिक्षण घेऊन चांगले करिअर करू शकतात, त्यानंतर ते कोणत्याही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करू शकतात. जाणून घेऊ विविध पर्याय... ITI डिप्लोमा म्हणजे काय? औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Industrial Training Institutes)ITI पॉलिटेक्निक प्रमाणेच अशी संस्था आहे, जिथे तुम्ही कोणत्याही विषयाशी संबंधित डिप्लोमा करू शकता.ITI मध्ये ६ महिने कालावधीपासून ते २ वर्षांपर्यंत कालावधीचे डिप्लोमा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता किमान दहावीपर्यंत असावी. या अभ्यासक्रमाच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे अभियांत्रिकी किंवा गैर-अभियांत्रिकी ट्रेडमधील कौशल्य विकासाशी संबंधित अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमांकडे विशेष लक्ष देणे. केल्यानंतर पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर आयटीआयनंतर पॉलिटेक्निक करता येते. ITI नंतर डिप्लोमा कोर्स ज्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक व्यवसाय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात ITI प्रशिक्षण घेतले आहे, त्यांच्यासाठी अनेक अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ITI अभ्यासक्रमांच्या उलट, डिप्लोमा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये सैद्धांतिक आणि व्यावहारिक दोन्ही बाबींवर भर देतात. ऑल इंडिया ट्रेड टेस्ट आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया ट्रेड टेस्ट हा एक चांगला पर्याय आहे. NCVT ने याचे आयोजन केले आहे. ही परीक्षा एक प्रकारची कौशल्य चाचणी आहे जी आयटीआय विद्यार्थ्यांना प्रमाणित करते. AITT उत्तीर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना संबंधित ट्रेडमध्ये NCVT द्वारे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) दिले जाते आणि त्याचे प्रमाणपत्र NTC डिप्लोमा, अनेक अभियांत्रिकी ट्रेडमधील पदवी समतुल्य असते. ITI नंतर उद्योजकता विद्यार्थी ITI नंतर आंत्रप्रिनरशीप करू शकतात. ही एक दुहेरी प्रशिक्षण प्रणाली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक पर्यवेक्षणाखाली नोकरीवर प्रशिक्षण (OJT) आणि वर्गातील सूचना दोन्ही दिल्या जातात. उद्योजकता म्हणजे एक किंवा दिड वर्षांचे कौशल्य आणि सक्षमतेचे प्रशिक्षण. याद्वारे तुम्हाला त्याच संस्थेत कायमस्वरूपी नोकरीही मिळू शकते. विशेष शॉर्ट टर्म अभ्यासक्रम आयटीआय विद्यार्थ्यांना काही संस्था ATI सारखे विशेष अल्पकालीन अभ्यासक्रम शिकवतात. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य आणखी वाढवण्यास मदत करतात, ते त्यांच्या जॉब प्रोफाइल किंवा संबंधित डोमेनमधील उद्योगाच्या गरजा सहजपणे पूर्ण करू शकतात आणि नंतर सहजपणे नोकरी मिळवू शकतात. सरकारी नोकरी आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रात किंवा सरकारी एजन्सीमध्ये करिअर करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या हा एक उत्तम पर्याय आहे. ITI प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी रेल्वे, दूरसंचार/BSNL, IOCL, ONCG, राज्यवार PWD सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्समध्ये नोकरी शोधू शकतात, तर सरकारी क्षेत्रात ते भारतीय सशस्त्र दलात म्हणजे भारतीय नौदल, भारतीय सैन्यात नोकरी शोधू शकतात. हवाई दल, सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि इतर निमलष्करी दल इत्यादींमध्ये नोकऱ्या मिळू शकतात. खासगी क्षेत्रातील नोकऱ्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतात. खासगी क्षेत्रांतर्गत ज्या मुख्य क्षेत्रांमध्ये ITI विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात, त्यात बांधकाम, कृषी, वस्त्र, ऊर्जा आणि काही विशिष्ट नोकरी प्रोफाइल जसे की इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डिंग रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर मेकॅनिक यांचा समावेश होतो. स्वयं-रोजगार या विद्यार्थ्यांसाठी स्वयं-रोजगार हा कदाचित सर्वोत्तम पर्याय आहे. कारण आयटीआयमधील प्रात्यक्षिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा स्वयंरोजगार मिळविण्याचे प्रशिक्षणही देते. परदेशात नोकऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात नोकरी करता येते. आंतरराष्ट्रीय तेल आणि वायू कारखाने आणि शिपयार्ड इत्यादींमध्ये मालवाहतूक इत्यादीसारख्या विशिष्ट व्यवसायांसाठी नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YR9kyF
via nmkadda