Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-11-16T10:43:08Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

शिक्षणाला वय नसतं! १०४ वयाच्या आज्जीबाईंना १०० पैकी ८९ गुण!! Rojgar News

Advertisement
केरळमधील कोट्टयम येथील एका १०४ वर्षे वयाच्या आज्जी बाईंचं गावात खूप कौतुक होत आहे. आज्जीबाईंनी परीक्षेत १०० पैकी ८९ गुण मिळवले आहेत. केरळ राज्य साक्षरता मिशनच्या ()च्या चाचणीत आज्जीबाईंनी ही कमाल केली आहे. या परीक्षेला साक्षरता चाचणी देखील म्हटले जाते. कोट्टयम जिल्ह्यातील अयर्कुन्नम पंचायतीने या चाचणीचे आयोजन केले होते. या कोट्टयम तिरुवंचुर अयर्कुन्नम पंचायतीतील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे त्या कधीही शाळेत गेलेल्या नाहीत. त्यांचे पती टी. के. कोन्ती यांचे २००२ मध्ये निधन झाले. आज्जीबाईंनी घराजवळच्या साक्षरता वर्गांना अगदी अलीकडे जायला सुरुवात केली होती. आता या चाचणीत १०० पैकी ८९ गुण मिळाल्याने कुट्टीयम्मा चौथीची परीक्षा देण्यास पात्र ठरल्या आहेत. कुट्टीयम्माच्या शिक्षिकेने त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवले. कुट्टीयम्मा म्हणतात,'माझ्या टिचरने मला मल्याळममध्ये लिहायला आणि वाचायला शिकवलं.' कुट्टीयम्मा दररोज वर्तमानपत्र वाचतात. त्यांना प्रार्थना गीतंही गायला आवडतं. यापूर्वी २०१८ मध्य कार्थीयानी अम्मा या ९६ वर्षांच्या आजींनी १०० पैकी ९८ गुण पटकावले होते. त्या या परीक्षेला बसणाऱ्या सर्वाधिक वयाच्या परीक्षार्थी होत्या. केरळ राज्य साक्षरता मिशन ही संस्था केरळ सरकारच्या शिक्षण विभागांतर्गत काम करते. राज्यातील सर्व नागरिकांना माध्यमिक पातळीपर्यंतचं शिक्षण देणं हे या संस्थेचे उद्दीष्ट आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qLfv2O
via nmkadda