Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-11-16T10:43:12Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Government job: मध्य रेल्वेत शिक्षक भरती, दरमहा २७ हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Advertisement
Railway Teachers Recruitment: मध्ये रेल्वेतर्फे शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. या पदांसाठी उमेदवारांची निवड एका मुलाखतीच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागेल. रेल्वेने टीजीटी रिक्त जागा, पीजीटी रिक्त जागा आणि प्राथमिक शिक्षक या पदांसाठी रिक्त जागांसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अनुभव, मुलाखतीची तारीख आणि पत्ता यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांचा तपशील पीजीटी इंग्रजी – १ पदं पीजीटी इकॉनॉमिक्स –१ पदं पीजीटी बिझनेस स्टडीज – १ पदं टीजीटी सायन्स – १ पदं टीजीटी कॉम्प्युटर सायन्स – १ पदं टीजीटी सोशल सायन्स – १ पदं टीजीटी इंग्रजी – २ पदं प्राथमिक शिक्षक – २ पदं एकूण पदांची संख्या – १० पदे पात्रता पीजीटी इंग्रजी – इंग्रजी साहित्यात एमए पदवी आणि बी.एड. पीजीटी इकॉनॉमिक्स – अर्थशास्त्रात एमए पदवी आणि बी.एड. पीजीटी बिझनेस स्टडीज - एम.कॉम आणि बी.एड. टीजीटी सायन्स - बीएससीसह बीएड आणि सीटीईटी पात्र. टीजीटी कॉम्प्युटर सायन्स - बीएससी कॉम्प्युटर सायन्स आयटी आणि एमसीए. टीजीटी सोशल सायन्स - इतिहास, भूगोल किंवा राज्यशास्त्र या विषयात बीए पदवी आणि बी.एड. टीजीटी इंग्रजी - इंग्रजीमध्ये बीए पदवी, बीएड आणि सीटीईटी प्रमाणपत्र. प्राथमिक शिक्षक - किमान ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण आणि दोन वर्षे डी.एड. पगार PGT पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २७ हजार ५०० रुपये प्रति महिना पगार मिळेल. टीजीटी पदासाठी दरमहा २६ हजार ५०० रुपये प्रति महिना पगार दिला जाईल. प्राथमिक शिक्षकांच्या पदांसाठी दरमहा २१ हजार २५० रुपये पगार दिला जाईल. हे मूळ वेतन आहे. याशिवाय उमेदवारांना रेल्वेच्या नियमानुसार संपूर्ण पगारासह इतर भत्तेही दिले जातील. मुलाखत पीजीटी साठी मुलाखत - २५ नोव्हेंबर २०२१ सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत टीजीटी साठी मुलाखत - २६ नोव्हेंबर २०२१ सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत प्राथमिक शिक्षकांसाठी मुलाखत - २७ नोव्हेंबर २०२१ सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत असा करा अर्ज या रिक्त पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. मात्र अर्ज पोस्टाने पाठवण्याची गरज नाही. बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. मागितलेली सर्व माहिती योग्य भरा. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह मुलाखतीच्या नियोजित तारखेला आणि दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे. तेथे अर्ज द्यावा लागेल. उमेदवारांना आपला अर्ज घेऊन प्रिन्सिपल चेंबर ऑफ सेंट्रल रेल्वे सेकंडरी (ईएम) स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कल्याण या पत्त्यावर यावे लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nkGh00
via nmkadda