Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-11-15T06:45:03Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CLAT २०२२ परीक्षा दोनदा घेण्याचा निर्णय, CNLU ने जाहीर केल्या तारखा Rojgar News

Advertisement
CLAT 2022: पुढील वर्षीच्या क्लॅट परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (Consortium of National Law University or )ने कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (Common law Admission Test or CLAT) २०२२ च्या प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या सीएनएलयूच्या कार्यकारी समिती आणि जनरल बॉडीच्या बैठकीत २०२२ मध्ये होणाऱ्या क्लॅट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर अपडेट पाहता येणार आहे. हैदराबाद येथील नालासार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ येथील प्राध्यापक फैजान मुस्तफा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर देण्यात आलेल्या अपडेटनुसार, २०२२ मध्ये पहिल्यांदाच दोनदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्लॅट २०२२ चा पहिला टप्पा ८ मे रोजी आणि दुसरा टप्पा १८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. क्लॅट २०२२ मध्ये झाले बदल कार्यकारी समिती आणि महामंडळाच्या बैठकीत, क्लॅट २०२२ परीक्षेमध्ये इतर काही बदलांचा निर्णय घेण्यात आला. हा बदल उमेदवारांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. क्लॅट समुपदेशन शुल्क: बैठकीत क्लॅट २०२२ साठी समुपदेशन शुल्क कमी करण्यात आले आहे. यावेळी घेण्यात येणाऱ्या सीएलएटी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांपैकी सर्वसाधारण श्रेणीसाठी समुपदेशन शुल्क ५० हजारांऐवजी ३० हजार असणार आहे. तसेच एससी, एसटी, ओबीसी, बीसी, इड्ब्ल्यूएस, दिव्यांग आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी समुपदेशन शुल्क केवळ २० हजार रुपये असणार आहे. विद्यार्थ्यांची गोपनीयता: उमेदवारांचे तपशील कोणत्याही विद्यापीठ किंवा कोणत्याही तिसऱ्या संस्थेला शेअर न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही डिटेल्स शेअर करण्यासाठी उमेदवाराची संमती असेल तरच, त्याचे/तिचे तपशील परीक्षा मंडळाद्वारे संस्थेला दिले जातील असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. क्लॅट कन्वेअर: या बैठकीमध्ये हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रायपूरचे कुलगुरु वी.सी.विवेकानंद यांची क्लॅट २०२२ परीक्षेसाठी संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30svfwZ
via nmkadda