Advertisement

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (CBSE)१६ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET)आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे, त्यांना आता परीक्षेच्या प्रवेश पत्राची (Admit Card)प्रतीक्षा आहे. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते आणि यात सहभागी होऊन, यशस्वी होऊन उमेदवार आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करतात. या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उमेदवारांनी १९ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज भरले होते. यंदा CTET परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी देशभरात ३०० हून अधिक शहरांमध्ये परीक्षा केंद्रे तयार केली जात आहेत. अॅडमिट कार्ड कधी? CTET परीक्षेचे अॅडमिट कार्ड नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जारी केले जाऊ शकते. CTET परीक्षेचे अॅडमिट कार्ड परीक्षेच्या १५ ते २० दिवस आधी जारी केले जाते. यावेळीही उमदेवारांना सीटीईटी परीक्षेचे अॅडमिट कार्ड परीक्षेच्या १५ ते २० दिवस म्हणजेच नोव्हेंबर अखेरपर्यंत मिळेल अशी शक्यता आहे. मात्र यासंबंधी कोणतीही अधिकृत सूचना अद्याप मिळालेली नाही. अॅडमिट कार्ड आणि परीक्षेसंबंधीच्या ताज्या माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला नियमितपणे भेट द्यावी. येथे मिळेल नोकरी CTET परीक्षेत पात्र ठरतील त्या उमेदवारांना केंद्र सरकारी शाळांमध्ये नोकरी मिळवू शकतात. CTET प्रमाणपत्र मिळाल्यानंतर उमेदवारांना केंद्रीय विद्यालय (KVS), नवोदय (NVS), आर्मी शिक्षक, ERDO सारख्या केंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज करता येईल. यासह प्रमाणपत्र असणारे उमेदवार अन्य राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शिक्षक पदांसाठी अर्ज करू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nIXGQ9
via nmkadda