TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Delhi Pollution: दिल्लीतील शाळा, कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंदच Rojgar News

हवेच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली एनसीआर भागातील शाळा, महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (, )सर्व शाळा, कॉलेजांना तूर्त ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी शाळा १३ नोव्हेंबर पासून आठवडाभर बंद ठेवण्याची घोषणा दिल्ली सरकारने केली होती. मात्र प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याने, पुढील आदेशापर्यंत राज्यभरातल्या सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला. सर्व शाळा, महाविद्यालयांचे वर्ग या कालावधीत ऑनलाइन सुरू राहणार आहेत. दिल्ली सरकारने वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर योजलेल्या उपाययोजनांमध्ये शाळा, कॉलेज बंद ठेवणे या पर्यायाचा समावेश आहे. हवेच्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारकडे कोणतीही आपत्कालीन योजना नसल्याबद्दल केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने वारंवार दिल्ली सरकारला जाब विचारला होता. या पार्श्वभूमीवर हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा आदेश दिला. शिवाय यापूर्वी शेजारील हरयाणा सरकारने गुरुग्राम, फरिदाबाद, सोनिपत, झिजर या चार शहरातील शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दिल्ली सरकारनेही शाळा बंदचा निर्णय घेतला. दरम्यान, दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अशी माहिती दिली आहे की, दिल्लीतील ढासळणारी हवेची गुणवत्ता लक्षात घेऊन सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण संस्था, ग्रंथालये २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत बंद ठेवल्या आहेत. परीक्षा सुरू असलेल्या संस्थांना यातून वगळण्यात आले आहे. कमीतकमी वाहने रस्त्यावर यावीत या हेतूने सर्व खासगी कार्यालये, आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना १७ नोव्हेंबरपर्यंत घरून काम करण्याची मुभा देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30Ctg9s
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या