Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-11-23T08:43:36Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Government job: सेंट्रल कोलफिल्ड्समध्ये दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी Rojgar News

Advertisement
CCL : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. सेंट्रल कोल्फिल्ड्स लिमिटेड (CCL) मध्ये विविध पदांवर भरती केली जाणार असून यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. अप्रेंटिस अॅक्ट १९६१ अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदांची संख्या, अर्ज प्रक्रिया याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या अंतर्गत एकूण ५३९ पदे भरली जाणार आहेत. यांचा सविस्तर तपशील पुढे देण्यात आला आहे. पदांचा तपशील इलेक्ट्रीशियन- १९० पदे फिटर- १५० पदे अकाऊंटंट - ३० पदे मशीनिस्ट- १० पदे टर्नर- १० पदे प्लंबर- ७ पदे इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक्स- १० पदे कारपेंटर- २ पदे बुक बांइंडर- २ पदे फोटोग्राफर- ३ पदे गार्डनर- १० पदे पेंटर- २ पदे सरदार- १० पदे फूड प्रोडक्शन- १ पद शैक्षणिक अर्हता सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेडद्वारे जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार या पदांवरील भरतीसाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असण अनिवार्य आहे. तसचे संबंधित ट्रेडमध्ये एनसीवीटी / एसीवीटीकडून आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे. आरक्षित वर्गातील उम्मीदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे आणि एससी/एसटी उमेदवारांना ५ वर्षांपर्यंतची सवलत देण्यात आली आहे. स्टायपेंड उम्मीदवारांची निवड मेरिट लिस्टच्या आधारे केली जाणार आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७ हजार रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे. असा करा अर्ज स्टेप १: उम्मीदवाराने सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org वर जा. स्टेप २: येथे अप्रेंटिस भरती संबंधित लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: सर्व आवश्यक माहिती भरा. स्टेप ४: सर्व माहिती भरल्यावर आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. स्टेप ५ : भरलेला अर्ज स्क्रिनवर दिसेल. तो डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा अर्जाची शेवटची तारीख या भरतीसाठी उमेदवारांना ५ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. शेवटच्या क्षणी वेबसाइटवर अधिक लोड झाल्यास अर्ज करताना समस्या उद्भवू शकतात. म्हणून इच्छुक उम्मीदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org वर जाऊन अर्ज करायचा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HLJ2Q5
via nmkadda