Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-11-16T12:44:27Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Government Job: नॅशनल फर्टिलायझर्समधील १८३ पदांसाठी अर्ज करण्यास अखेरची संधी Rojgar News

Advertisement
Recruitment: भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील मिनी-रत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या लिमिटेड (NFL)मध्ये १८३ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू १७ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी अजूनही अर्ज केला नसेल तर तात्काळ करणे गरजेचे आहे. शेवटच्या क्षणी अनेक युजर्सनी एकाचवेळी लॉगिन केल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. या पदभरतीसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. NFL मधील या पदांसाठी भरती जाहिरात (नंबर ०३/२०२१) २० ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आली होती. याआधी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर होती. १७ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. पदभरती जाहिरात (क्र. ०३/२०२१) नुसार ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंट ग्रेड II (प्रोडक्शन, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल), लोको अटेंडंट (ग्रेड II आणि ग्रेड- III), अटेंडंट ग्रेड -I (मेकॅनिकल,फिटर आणि इलेक्ट्रिकल) आणि मार्केटींक रिप्रेझेंटेटिव्ह पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. असा करा अर्ज नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये जाहिरात केलेल्या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात. त्यासाठी सर्वप्रथम एनएफएलची अधिकृत वेबसाइट nationalfertilizers.com वर जा. वेबसाइटवर गेल्यानंतर करिअर सेक्शनमध्ये जा. त्यानंतर Recruitment in NFL वर क्लिक करा. येथे 'Recruitment of Non-Executives (Workers) in Marketing, Transportation and Various Technical Disciplines-2021' या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर उमेदवार अर्जाच्या पेजवर पोहोचू शकतील. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २१ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाली आहे. उमेदवार १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज माध्यमातून सादर करू शकतील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एनएफएल भरती २०२१ नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अर्जाच्या पेजवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. रिक्त पदांचा तपशील ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंट ग्रेड II (प्रोडक्शन) - ८७ पदे ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंट ग्रेड II (इंस्ट्रुमेंटेशन) - १५ पदे ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंट ग्रेड II (इलेक्ट्रिकल) - ७ पदे लोको अटेंडंट (ग्रेड II) - ४ पदे लोको अटेंडंट (ग्रेड- III)-१९ पदे अटेंडंट ग्रेड- I (मेकॅनिकल-फिटर)-१७ पदे अटेंडंट ग्रेड- I (इलेक्ट्रिकल)-१९ पदे मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह - १५ पदे


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Dngvha
via nmkadda