ICSE टर्म १ परीक्षांना सुरुवात, विद्यार्थ्यांना 'या' सूचनांचे पालन करणे आवश्यक Rojgar News

ICSE टर्म १ परीक्षांना सुरुवात, विद्यार्थ्यांना 'या' सूचनांचे पालन करणे आवश्यक Rojgar News

2022: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (Council for the Indian School Certificate Examinations, CISCE)ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. यानुसार बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली आहे. बारावी परीक्षांचे वेळापत्रक आधीच प्रसिद्ध करण्यात आले होते. दहावीच्या परीक्षा २९ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. यानुसार बारावी टर्म १ परीक्षा २०२२ इंग्रजी साहित्य किंवा पेपर २ ने सुरू होत आहे. बारावीच्या टर्म १ च्या परीक्षा २० डिसेंबर २०२१ पर्यंत होणार आहेत आणि शेवटच्या दिवशी अकाउंट्स पेपर होणार आहे. आयसीएसईतर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या बोर्ड परीक्षा दोन टप्प्यांत आयोजित केल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात म्हणजेच टर्म १ च्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निर्देश जाहीर करण्यात आले असून याचे पालन करणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. महत्वाच्या सूचना विद्यार्थ्यांना परीक्षा वेळेच्या किमान १० ते १५ मिनिटे आधी पोहोचणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि प्रश्नपत्रिकेवर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. विद्यार्थ्‍यांनी प्रश्‍नपत्रिकेसह उत्‍तरपत्रिकेच्‍या वरच्‍या विशिष्‍ट जागेवर त्‍यांचा युनिक आयडी आणि इंडेक्स नंबर लिहावा लागेल. विद्यार्थ्यांनी उत्तरपुस्तिकेवर उत्तरपत्रिकेच्या वरच्या शीट व्यतिरिक्त कुठेही काही लिहू नये. जे विद्यार्थी परीक्षेच्या ठिकाणी उशिरा पोहोचतील त्यांना पर्यवेक्षक परीक्षकांना समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी मास्क घालावे. हात स्वच्छ करावेत. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. टर्म १ च्या परीक्षेसाठी डिजीटल मार्कशीट इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ISCE) द्वारे दहावी आणि बारावीसाठी घेण्यात आलेल्या टर्म १ च्या परीक्षेच्या सूचना आणि निकालासंदर्भातील अपडेट जाहीर करण्यात आली आहे. काऊन्सिलने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना टर्म परीक्षांच्या निकालासोबतच डिजीटल मार्कशीट जाहीर केली जाणार आहे. दहावीची परीक्षा २९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दहावीच्या परीक्षा १५ डिसेंबर २०२१ आणि बारावीची परीक्षा २० डिसेंबर रोजी संपेल. सविस्तर वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीचा इंग्रजी पेपर II चे आयोजन २२ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. यानुसार, इंग्रजी भाषा पेपर I परीक्षा २३, भौतिकशास्त्र पेपर थ्योअरी २५, गणित २९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल. आयसीएसईने करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यानंतर विशिष्ट सूत्रानुसार, मूल्यांकन करत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला होता. २४ जुलै रोजी बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. यावर्षी ICSE म्हणजेच दहावीचा निकाल ९९.९८ टक्के होता. ISC म्हणजेच बारावीच्या निकालाची उत्तीर्णता ९९.७६ टक्के होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qUJiq1
via nmkadda

0 Response to "ICSE टर्म १ परीक्षांना सुरुवात, विद्यार्थ्यांना 'या' सूचनांचे पालन करणे आवश्यक Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel