Advertisement

Carbon Removal Competition: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई () च्या टीमने टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांच्या एक्सप्राइज (XPRIZE) फाउंडेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेत भारताचे नाव रोशन केले आहे. वातावरणातील कार्बन काढून टाकू शकणारे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या स्पर्धेत मुंबई आयआयटीच्या टीमने कोट्यावधीची रक्कम जिंकली आहे. मधील चार विद्यार्थी आणि दोन शिक्षकांनी सीओपी-२६ मधील शाश्वत इनोव्हेशन फोरममध्ये मॉर्डन टेक्निकसाठी हे बक्षिस जिंकले आहे. आयआयटी मुंबईच्या चार सदस्यांच्या टीमला कार्बन-कॅप्चरिंग तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी २ लाख ५० हजारांचे अनुदान मिळाले आहे. सध्या ग्लासगो येथे सुरू असलेल्या सीओपी-२६ मधील शाश्वत इनोव्हेशन फोरममध्ये अनुदानाची घोषणा करण्यात आली. एलन मस्क फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्बन रिमूव्हल स्टुडंट स्पर्धेत पात्र होण्यासाठी सहभागी संघाच्या सदस्यांपैकी किमान ५० टक्के सदस्यांची शैक्षणिक संस्थेत नोंदणी असणे आवश्यक होते. श्रीनाथ अय्यर आणि त्यांच्या टीमने पटकावले पारितोषिक एलन मस्क फाउंडेशनने आयोजित केलेल्या XPRIZE कार्बन रिमूव्हल माइलस्टोन्सच्या स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. ज्यामध्ये श्रीनाथ अय्यर आणि त्यांच्या टीमला २.५ लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे १ कोटी ८५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. आयआयटीचे श्रीनाथ अय्यर (पीएचडी विद्यार्थी), अन्वेषा बॅनर्जी (पीएचडी विद्यार्थी), सृष्टी भामरे (बीटेक + एमटेक) आणि शुभम कुमार (ज्युनियर रिसर्च फेलो) ही पुरस्कार जिंकणारी भारतातील एकमेव टीम आहे. १९५ टीम्सचा सहभाग जागतिक स्तरावरील १९५ संघांपैकी १० देशांतील २३ विजेत्या संघांना बक्षीस दिले जाणार आहे. ग्लासगो येथील सीओपी-२६ सस्टेनेबल इनोव्हेशन फोरममध्ये ही घोषणा करण्यात आली. दरम्यान एलन मस्क फाउंडेशन आणि एक्सप्रेसद्वारे गेल्या ४ वर्षांपासून कार्बन उत्सर्जन क्षेत्रातील संशोधकांना हा पुरस्कार दिला जात आहे. 'जागतिक तापमानात १.१ अंश सेल्सिअसची वाढ औद्योगिकीकरणानंतर कार्बन पातळीत वाढ झाल्यामुळे झाली असे प्राध्यापक अर्णब दत्ता म्हणाले यांनी म्हटले. ऊर्जा, पेट्रोलियम, पोलाद, खत आणि सिमेंट उद्योग हे काही प्रमुख योगदान देणारे क्षेत्र आहेत. सध्याच्या उद्योगांमध्ये कार्बन उत्सर्जनाचा समावेश करून त्यांचे स्रोत मर्यादित करणे हा आमचा हेतू असल्याचेही ते म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3c8YWW6
via nmkadda