Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १३, २०२१ WIB
Last Updated 2021-11-13T07:43:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NAS: ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली चाचणी Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाला (, ) राज्यात उत्तम प्रतिसाद मिळाला असून, निवडलेल्या शाळांमधील तिसरी, पाचवी, आठवी, दहावीच्या ८० टक्के विद्यार्थ्यांनी वर्गात उपस्थित राहून आपला सहभाग नोंदविला. पुणे जिल्ह्यात ९० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून () रात्री उशिरा दिली. देशातील शालेय विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीतील संपादणुकीचे मूल्यांकन करणे; तसेच देशातील शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी करण्यात येते. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन पातळ्यांवर ही सर्वेक्षण चाचणी घेतली जाते. सर्वेक्षणातील शाळा 'रँडम सॅम्पलिंग' पद्धतीने निवडण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणात सुसूत्रता येण्यासाठी हे सर्वेक्षण देशभरात एकाच दिवशी करण्यात येते. यापूर्वी हे सर्वेक्षण २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात झाले होते. त्यानुसार २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील नॅस सर्वेक्षण शुक्रवारी एकाच वेळी निवडलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये झाले. करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून हे सर्वेक्षण झाल्याचे शिक्षकांनी सांगितले. या सर्वेक्षणासाठी राज्यातील सात हजार ३३० शाळांमधील दोन लाख ३४ हजार ५५ विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायचे होते. त्यानुसार राज्यातील शाळांमधील ८० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला. या सर्वेक्षणात पुणे जिल्ह्यातील शाळा आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. त्यानुसार तिसरीचे ९५.६८ टक्के विद्यार्थी. पाचवीचे ९३.२१ विद्यार्थी, तर आठवीचे ९४.२३ विद्यार्थी आणि दहावीचे ८८.५५ विद्यार्थी उपस्थित होते. सर्वेक्षण निवडलेल्या शाळांमध्ये सुरळीत पार पडले असून, सर्वेक्षणासाठी सर्वच शिक्षक उपस्थित होते. अनेक शाळांकडून माहिती येत असल्याने, या सर्वेक्षणाच्या टक्केवारीत वाढ होऊ शकते, अशी माहिती एससीईआरटीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या सर्वेक्षणाला तिसरीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्याचवेळी तुलनेने दहावीच्या विद्यार्थ्यांनी कमी प्रतिसाद दिला. सुट्ट्या, संपामुळे विद्यार्थी कमी राज्यात एसटी संपामुळे सार्वजनिक वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी प्रवास करण्यात अडचणी आल्याचे चित्र आहे. त्यातच यंदा शाळांच्या दिवाळीच्या सुट्ट्यांचे नियोजन योग्य प्रकारे झाले नाही. या कारणामुळे काही विद्यार्थी सर्वेक्षणाला उपस्थित राहू शकले नाहीत, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3c7WSxK
via nmkadda