Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १३, २०२१ WIB
Last Updated 2021-11-13T11:43:27Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IIT दिल्लीचे ऑफलाइन वर्ग जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार Rojgar News

Advertisement
IIT Delhi: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्लीतर्फे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही रामगोपाल राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पहिल्या वर्षी ऑफलाइन वर्ग नोव्हेंबरपर्यंत सुरू केले जातील. पण जानेवारीपासून, करोनाच्या सर्व प्रोटोकॉलच पालन करून, आम्ही पूर्वीप्रमाणेच वर्ग सुरु करु असे राव म्हणाले. तसेच वसतिगृह पुन्हा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही ते म्हणाले. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जर सर्व काही वेळेनुसार ठीक झाले तर दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA)आणखी अनेक गोष्टी शिथिल करेल अशी अपेक्षा IIT दिल्लीला आहे. IIT दिल्लीचे सर्व अभ्यासक्रम त्वरित ऑफलाइन होणार नाहीत. विविध विषयांतील मुख्य अभ्यासक्रम आधी ऑफलाइन असतील आणि पर्यायी अभ्यासक्रम ऑनलाइन सुरू राहतील. म्हणजेच ऑफलाइन क्लाससोबतच ऑनलाइन क्लासही सुरू राहणार आहेत. ठराविक विषयांसाठीच ऑफलाइन वर्ग सुरु राहणार आहेत. आम्ही भविष्यात ऑफलाइन परीक्षा आयोजित करण्याच्या योजनेवर चर्चा करत आहोत. तसेच केवळ ५० टक्के लोक वर्गांना उपस्थित राहतील यावर विचार सुरु असल्याचे ते म्हणाले. ऑफलाइन वर्गांसाठी नियोजन कोणते वर्ग कधी चालवले जातील?, किती विद्यार्थी येऊ शकतील?, या सर्वांबाबत नियोजन केले जाणार आहे. या सर्वांसोबतच ऑनलाइन वर्गही सुरू राहणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक दिवसांपासून शैक्षणिक संस्था बंद आहेत. मात्र, आता कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याने पूर्वीप्रमाणेच परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या वर्षी अनेक परीक्षा रद्द झाल्या तसेच अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. पण आता पुन्हा शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्याच वेळी, बऱ्याच काळापासून बंद असलेल्या आयआयटी दिल्लीने देखील वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ऑफलाइन क्लासेस सुरू झाल्यानंतर ऑनलाइन क्लासेसचा पर्यायही देण्यात आला आहे. वर्ल्ड रॅंकिंगमध्ये घसरण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( ) दिल्ली संस्थेने इंजिनीअरिंग आणि टेक्नोलॉजीमधील जगातील टॉप २०० संस्थांमधील आपले स्थान कायम ठेवले आहे. पण या संस्थेला क्यूएस आणि टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सारख्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत कोणतेही टॉपचे स्थान मिळू शकले नाही. दिल्लीच्या संचालकांनी यामागचे कारण स्पष्ट केले आहे. आयआयटी केवळ इंजिनीअरिंगवर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रमवारीत ते आपले स्थान गमावत असल्याचे स्पष्टीकरण आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही रामगोपाल राव यांनी दिले. 'आम्ही इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञानात आमची क्रमवारी सुधारत आहोत. परंतु जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत टॉपच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी आम्हाला अजून थोडा वेळ लागेल. आम्ही इतर परदेशी विद्यापीठांच्या विशेषत: यूएस विद्यापीठाच्या तुलनेत पुरेसे व्यापक नाही, हे यामागचे मुख्य कारण असल्याचे राव यावेळी म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kz77iV
via nmkadda