TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

NEP 2020: IIIT मध्ये सुरु होणार ८ वर्षांचा अभ्यासक्रम Rojgar News

Course: आयआयआयटीने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत आठ वर्षांचा अभ्यासक्रम (8 years New course) तयार केला आहे. अकरावीचे विद्यार्थीही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. अकरावीसोबतच बारावी उत्तीर्ण विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट ते रिसर्चपर्यंतच्या पदव्या घेता येणार आहेत. हा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरण () अंतर्गत तयार करण्यात आला आहे. IIIT ने सुरु केलेल्या या अभ्यासक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार वेगवेगळ्या संस्थांमधून प्रत्येक सेमिस्टरचा अभ्यास करण्याची सुविधा देखील दिली जाणार आहे. विद्यार्थी किती वर्षांचा अभ्यास करतात यावरुन त्यांना त्यांची पदवी दिली जाणार आहे. यासाठी IIIT तर्फे विविध औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांसोबत एमओयू करण्याची तयारी सुरु आहे. IITच्या सिनेटतर्फे ही जबाबदारी संस्थेच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन (EC) शाखेचे प्रा. नितेश पुरोहित यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत हा अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचे पुरोहित यांनी सांगितले. या अभ्यासक्रमाचे प्रवेश शैक्षणिक सत्र २०२२-२०२३ पासून सुरू होणार आहेत. जेईई मेन आणि जेईई अॅडव्हान्स्ड अंतर्गत या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची तयारी सुरू आहे. या अभ्यासक्रमासाठी संस्थेच्या सिनेटने एक समिती स्थापन केली आहे. या अभ्यासक्रमाबाबत समितीच्या अनेक बैठका झाल्या आहेत. या परिषदेला अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित राहणार असल्याचे प्रा. पुरोहित म्हणाले. या अभ्यासक्रमाबाबत संस्थेतर्फे ३ आणि ४ डिसेंबर रोजी लोकांची परिषद आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये AICTE, AIU, NITI आयोग, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ लोकांसह देशातील नामांकित IITs, NITs, TripleITs, औद्योगिक विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठांमधील शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग असणार आहे. हा अभ्यासक्रम आयोजित करण्यासाठी त्यांच्याशी करारही केला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नियमानुसार कोणत्याही संस्थेतून सेमिस्टरचे शिक्षण घेता येईल. प्रमाणपत्रापासून ते पीएचडी पदवीपर्यंत या अभ्यासक्रमात प्रथम वर्ष पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, द्वितीय वर्ष पूर्ण केल्यावर कौशल्य प्रमाणपत्र, तृतीय वर्ष डिप्लोमा, चौथ्या वर्षी बॅचलर डिग्री, पाचव्या वर्षी पीजी डिप्लोमा, सहाव्या वर्षी पीजी पदवी आणि आठव्या वर्षी पदवी प्रदान केली जाते असे प्रो. पुरोहित म्हणाले. या नवीन अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी मंत्रालयाकडे पाठवला जात आहे. याला मान्यता मिळाल्यानंतर शैक्षणिक सत्र २०२२-२१ मध्ये या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु होतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32eh6El
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या