बारावी श्रेणीसुधार योजनेच्या गुणपत्रिकेसाठी मुदतवाढ Rojgar News

बारावी श्रेणीसुधार योजनेच्या गुणपत्रिकेसाठी मुदतवाढ Rojgar News

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) बारावीच्या (HSC) फेब्रुवारी-मार्च २०२० व नोव्हेंबर-डिसेंबर २०२० श्रेणीसुधार परीक्षेची () गुणपत्रिकेसाठी विकल्प सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. मंडळाच्या निवेदनात म्हटले आहे, निकाल जाहीर झाल्यानंतर श्रेणी सुधार योजने अंतर्गत प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांनी विकल्प सादर करून सुधारित सुधारित गुणपत्रिकेची मागणी केल्यास सुधारित गुणपत्रिका बदलून देण्याचा कालावधी एक महिन्याऐवजी सहा महिन्यापर्यंत वाढविण्यात आलेला होता. परंतु कोविडमुळे उद्भवलेली परिस्थिती व विद्यार्थी हित लक्षात घेत, फेब्रुवारी-मार्च २०२० व नोव्हेंबर-डिसेंबर २०२० परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ झालेल्या व विकल्प सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून विकल्प सादर करण्यास १५ डिसेंबर २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. काय आहे श्रेणीसुधार योजना (Class Improvement Scheme)? ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत आणि त्यांना गुण वाढवण्याची संधी हवी आहे, त्यांना राज्य मंडळ एक नव्हे तर दोन परीक्षांमध्ये पुन्हा बसण्याची संधी देते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CikiLm
via nmkadda

0 Response to "बारावी श्रेणीसुधार योजनेच्या गुणपत्रिकेसाठी मुदतवाढ Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel