Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १०, २०२१ WIB
Last Updated 2021-11-10T05:43:55Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

टीईटी पुन्हा स्थगित होणार? आता यूजीसी नेट परीक्षेशी होतेय क्लॅश Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत (Teachers Eligibility Test, MAHA 2021) पुन्हा एकदा अडथळे आले आहेत. याच परीक्षेच्या दिवशी 'यूजीसी'ची 'नेट' परीक्षा () होणार असल्याने आता तिसऱ्यांदा स्थगित होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यापूर्वी आरोग्य भरतीच्या परीक्षेमुळे ३१ ऑक्टोबरला होणारी 'टीईटी' स्थगित करण्यात आली होती. त्यापूर्वीही एकदा राज्यातील एका भरती प्रक्रियेच्या परीक्षेसाठी 'टीईटी' पुढे ढकलली गेली. अखेर २१ नोव्हेंबरला या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते; पण आता पुन्हा एकदा प्राध्यापकांसाठी घेण्यात येत असलेली 'यूजीसी'ची नेट परीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत होत असल्याने 'टीईटी'पुन्हा एकदा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात परीक्षा परिषदेने नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे (NTA) निवेदन सादर केले असून, २१ नोव्हेंबरच्या दिवशी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची नेट परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी विनंती परीक्षा परिषदेकडून करण्यात आली आहे. 'एनटीए'कडून जर हे निवेदन मान्य झाले आणि २१ नोव्हेंबरला होणारे नेट परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले, तर 'टीईटी'ला कोणताही अडथळा येणार नाही. मात्र, जर एनटीएकडून परीक्षा त्याच दिवशी घेण्याचे ठरवले तर 'टीईटी' पुन्हा एकदा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. एक लाखापेक्षा जास्त अर्ज 'टीईटी' परीक्षेसाठी यंदा मोठ्या संख्येने अर्ज झाले असून, जवळपास एक लाख १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी 'टीईटी'साठी अर्ज केले आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आता पुन्हा एकदा जर 'नेट' परीक्षेमुळे 'टीईटी' लांबली तर विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3F2N2JL
via nmkadda