Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १०, २०२१ WIB
Last Updated 2021-11-10T05:43:57Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

स्टाफ सिलेक्शनतर्फे २५ हजारहून अधिक पदांची भरती, प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

Advertisement
Constable 2021: स्टाफ सिलेक्शनतर्फे ( Commission) जीडी कॉन्स्टेबल परीक्षा १६ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आह. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ssc.nic.in आणि प्रादेशिक वेबसाइटला भेट देऊन प्रवेशपत्र (SSC GD Constable Admit Card) डाउनलोड करता येणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे कॉन्स्टेबल (जीडी) परीक्षेचे आयोजन १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२१ दरम्यान केले जाणार आहे. एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा २०२१ ऑनलाइन सीबीटी (कॉम्प्युटर आधारित परीक्षा) माध्यमातून घेतली जाणार आहे. रिक्त जागांचा तपशील या रिक्त पदासाठी जाहीर केलेल्या नोटीसनुसार एकूण २५ हजार २७१ पदांची भरती केली जाणार आहे. त्यामध्ये पुरुष हवालदार पदाच्या २२,४२४ तर महिला हवालदाराची २८४७ पदे भरली जाणार आहेत. बीएसएफमध्ये ७५४५, सीआयएसएफमध्ये ८४६४, एसएसबीमध्ये ३८०६, आयटीबीपीमध्ये १४३१, एआरमध्ये ३७८५ आणि एसएसएफमध्ये २४० जागा रिक्त आहेत. CRPF आणि NIA मध्ये एकही जागा रिक्त नाही. कर्मचारी निवड आयोगातर्फे १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत देशातील विविध शहरांमध्ये GD कॉन्स्टेबल भरती परीक्षा २०२१ आयोजित करणार आहे. या भरती परीक्षेद्वारे (SSC GD Constable Admit Card), आसाम रायफल्समधील सीएपीएफ, एनआयए, एसएसए आणि रायफलमन (GD) च्या कॉन्स्टेबल (GD) च्या एकूण २५ हजार २७१ पदांची भरती केली जाणार आहे. या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र करा डाऊनलोड स्टेप १: सर्वप्रथम तुमच्या प्रादेशिक अधिकृत वेबसाइटवर जा. स्टेप २: अॅडमिट कार्ड पर्यायावर क्लिक करा. स्टेप ३: मागितलेली माहिती भरून सबमिट करा. स्टेप ४: तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५: भविष्यातील उपयोगासाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करा अशी होईल निवड सर्व प्रथम लेखी परीक्षा (कॉम्प्युटर आधारित) होईल. उत्तीर्ण उमेदवारांना फिजिकल फिटनेस टेस्ट (PET) आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट (PST) साठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग, जनरल नॉलेज आणि आणि जनरल अवेअरनेस, इलिमेंट्री मॅथ्स आणि इंग्रजी/हिंदी विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील. चारही विभागातून २५-२५ प्रश्न विचारले जातील. सर्व विभाग प्रत्येकी २५ गुणांचे असतील. पेपरचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केला जाईल. ही परीक्षा ()१० नोव्हेंबरला होणार आहे. यामध्ये १०० प्रश्न विचारले जातील. परीक्षेसाठी तुम्हाला ९० मिनिटे वेळ दिला जाईल. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगही असेल आणि चुकीचे उत्तर दिल्यास ०.२५ गुण वजा केले जातील. यामध्ये जनरल नॉलेज, रिजनिंग, गणित, इंग्रजी आणि हिंदी विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qmAZTu
via nmkadda