दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा परतावा लवकरच Rojgar News

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा परतावा लवकरच Rojgar News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने करोना काळात रद्द झालेल्या दहावी, बारावी परीक्षांचे शुल्क विद्यार्थ्यांना अंशत: परत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य मंडळाला हा शुल्क परतावा करावा लागत आहे. यासाठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. राज्य मंडळाने या शुल्क परताव्यासंबंधी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात असे म्हटले आहे की २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची दहावी आणि बारावीची परीक्षा करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. या परीक्षांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांच्या परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशत: करण्यात येणार आहे. राज्यातील माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा तपशील १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन नोंदवायचा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HgkQFo
via nmkadda

0 Response to "दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा परतावा लवकरच Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel