TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

सरकारी बॅंकांमध्ये ४१३५ पदांची भरती, परीक्षेचा तपशील जाणून घ्या Rojgar News

exam: आयबीपीएस पीओ प्रिलिम्स परीक्षा ४ आणि ११ डिसेंबर २०२१ पर्यंत घेतली जाणार आहे. या अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ११ बँकांमधून आठ बँकांमधील एकूण ४,१३५ रिक्त आहेत. (अजा-६७९, अज-३५०, इमाव-११०२, इडब्ल्यूएस-४०४, खुला-१६००). दिव्यांग उमेदवारांसाठी एकूण २१० पदे राखीव आहेत. या परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी सध्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत. अशावेळी परीक्षेत कोणत्या विभागातून कोणते विषय महत्त्वाचे आहेत याबद्दल माहिती घेऊया. इंग्रजी- वाचन आकलन, क्लोज टेस्ट, रिक्त जागा, वाक्यांची पुनर्रचना, वाक्यांश प्रतिस्थापन, जम्बल्ड वर्ड्स, रिजनिंग एबिलिटी-पजल टेस्ट, रँकिंग आणि टाइम, एलफॅबिटीक सिरीज, ब्लड रिलेशन, कोडिंग आणि डिकोडिंग, क्वान्टेटेटिव्ह एप्टीट्यूड- नंबर सिस्टिम, सिम्पल इंट्रेस्ट यांचा अभ्यास महत्वाचा ठरतो. महत्त्वाच्या तारखा नोटिफिकेशन जाहीर झाल्याची तारीख - १९ ऑक्टोबर २०२१ ऑनलाइन अर्ज नोंदणीची तारीख - २० ऑक्टोबर २०२१ ते ११ नोव्हेंबर २०२१ अर्ज शुल्क भरण्याची तारीख – २० ऑक्टोबर २०२१ ते ११ नोव्हेंबर २०२१ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० नोव्हेंबर २०२१ प्रिलिम्स प्रवेशपत्र जाहीर झाल्याची आणि डाउनलोड करण्याची तारीख - २० नोव्हेंबर २०२१ ते ११ डिसेंबर २०२१ प्राथमिक परीक्षेची तारीख – ४ डिसेंबर २०२१ आणि ११ डिसेंबर २०२१ मुख्य प्रवेशपत्र जारी होण्याची आणि डाउनलोड करण्याची तारीख - डिसेंबर २०२१/जानेवारी २०२२ मुख्य परीक्षेची तारीख- जानेवारी २०२२ निवड पद्धती- कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस- ऑनलाइन परीक्षा (अ) प्रीलिमिनरी परीक्षा- १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटं (इंग्रजी भाषा- ३० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड- ३५ प्रश्न, रिझनिंग अॅबिलिटी- ३५ प्रश्न, वेळ प्रत्येकी २० मिनिटं) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची. (ब) मुख्य परीक्षा- १. रिझनिंग अँड कम्प्युटर अॅप्टिट्यूड- ४५ प्रश्न, ६० गुण, वेळ ६० मिनिटं; २. जनरल/ इकॉनॉमी/ बँकिंग अवेअरनेस- ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटं; ३. इंग्रजी भाषा- ३५ प्रश्न, ४० गुण, वेळ ४० मिनिटं; ४. डेटा अॅनालिसीस अँड इंटरप्रिटेशन- ३५ प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटं; ५. इंग्रजी भाषेत पत्र लेखन आणि निबंध- २ प्रश्न, प्रत्येकी २५ गुण, वेळ ३० मिनिटं. ऑब्जेक्टिव्ह टाइप परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या ०.२५ गुण वजा केले जातील. (क) मुलाखत- ऑनलाइन मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांची १०० गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लेखी परीक्षेतील गुण प्रसिद्ध केले जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D7A6AM
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या