'या' विद्यार्थ्यांना युनिव्हर्सल पासशिवाय रेल्वे प्रवासाची मुभा Rojgar News

'या' विद्यार्थ्यांना युनिव्हर्सल पासशिवाय रेल्वे प्रवासाची मुभा Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची (MUHS Exams) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना युनिव्हर्सल पासशिवाय रेल्वे प्रवास करण्याची मुभा () देण्यात आली आहे. त्यामुळे लशीचे दोन्ही डोस न झालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वेचे एका दिवसाचे तिकीट काढून परीक्षा केंद्रावर पोहोचता येणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांना महिन्याभराचा पास मात्र काढता येणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. आरोग्य विद्यापीठामार्फत नोव्हेंबरपासून हिवाळी सत्र परीक्षा व उन्हाळी सत्र परीक्षांच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात झाली आहे. या परीक्षा सुरू असतानाच राज्य परिवहन महामंडळामार्फत जवळपास १५ दिवसांपासून संप सुरू आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडचणी येत आहेत. खासगी वाहनांनीही आपला दर दुपटीने वाढविला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्य सरकारने युनिव्हर्सल पासशिवाय परीक्षेसाठी रेल्वे प्रवास करण्यास परवानगी दिली असून, याचा लाभ आरोग्य विद्यापीठाची परीक्षा देणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. परीक्षेसाठी प्रवास करायचा असल्यास विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीवर आपले हॉल तिकीट तसेच ओळखपत्र दाखवून एक दिवसाचे तिकीट काढता येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर नियुक्ती असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही परीक्षा केंद्रांवरील ड्युटीसंबंधीच्या आदेशाची प्रत दाखवून हे तिकीट काढता येणार आहे. प्रत्येक दिवशी स्वतंत्रपणे तिकीट काढावे लागणार असून, परीक्षेसाठी कोणताही पास दिला जाणार नसल्याचे विद्यापीठामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ विद्यापीठामार्फत उन्हाळी सत्र २०२० परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्यात आली होती. यातील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. तसेच हिवाळी सत्र परीक्षा नुकतीच सुरू झाली असून, २९ नोव्हेंबरपर्यंत या लेखी परीक्षा असणार आहेत. राज्यभरातील जवळपास ४५ हजार विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. परिवहन महामंडळाच्या संपामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता होती. परंतु, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यातील अडचणी कमी झाल्या आहेत. परिवहन महामंडळाचा संप सुरू असूनही प्रात्यक्षिक परीक्षांना सुमारे ९८ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत रेल्वे प्रवासाच्या सुविधेचा विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. जवळपास १ हजार कर्मचारी या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. त्यांनाही याचा उपयोग होणार आहे. - डॉ. अजित पाठक, परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cEg1r5
via nmkadda

0 Response to "'या' विद्यार्थ्यांना युनिव्हर्सल पासशिवाय रेल्वे प्रवासाची मुभा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel