Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ११, २०२१ WIB
Last Updated 2021-11-11T06:43:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

एमपीएससीसाठी वयोमर्यादेत मुदतवाढ; उमेदवारांना आता वाढीव एक वर्ष मिळणार Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला () बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय () राज्य मंत्रिमंडळाने () बुधवारी घेतला आहे. करोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते, त्या विद्यार्थ्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांची ही मागणी होती, त्यानुसार सरकारने विद्यार्थी हिताचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. करोनाकाळात एमपीएससी विद्यार्थ्यांची परीक्षा कळीचा मुद्दा ठरला होता. करोनाकाळात स्थगित झालेली परीक्षा घेण्यासाठी पुणेसह राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. मात्र करोनाचे संकट वाढल्याने परीक्षा स्थगित करण्यात आली होती. या साऱ्या गोंधळात अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले. दोन वर्षे करोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी, अशी मागणी होती. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यानंतर एक वर्ष मुदतवाढ देण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे, अशा विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची आणखी एक संधी या विद्यार्थ्यांना मिळाली आहे. यामुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे १० ते १२ लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. या तुलनेत उपलब्ध जागा या हजारात असतात. यामुळे स्पर्धा फार अवघड असते. म्हणून मिळणारी ही संधी विद्यार्थ्यांना लाखमोलाची ठरेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DaLX20
via nmkadda