राष्ट्रीय शिक्षण दिवस का साजरा केला जातो? काय आहे महत्व? जाणून घ्या Rojgar News

राष्ट्रीय शिक्षण दिवस का साजरा केला जातो? काय आहे महत्व? जाणून घ्या Rojgar News

National : राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी देशात साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. देशातील विद्यार्थ्यांसाठी हा दिवस महत्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी विद्यार्थी विविध खेळ, स्पर्धांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करतात. सोबतच मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या आठवणींना उजाळा देतात. या दिवशी विद्यार्थ्यांकडून आपल्या शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त केले जाते. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते २ फेब्रुवारी १९५८ पर्यंत देशाचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिले. २००८ मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांचा वाढदिवस शिक्षण दिन म्हणून ओळखला जाण्यास मान्यता दिली. तेव्हापासून दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय शिक्षण दिनाचे महत्त्व भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री आझाद यांनी देशाचा शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळातच १९५१ मध्ये देशातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि १९५३ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली. विशेष कार्यक्रमांचे देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या दिवशी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या योगदानाचे स्मरण केले जाते. मौलाना आझाद यांच्या जयंतीदिनी देशातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात आणि मुलांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जातात. भारतरत्न देऊन सन्मानित मौलाना अबुल कलाम आझाद यांना १९९२ मध्ये भारत सरकारने भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला होता. हा सन्मान त्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे २२ फेब्रुवारी १९५८ रोजी दिल्लीत निधन झाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HbFvtT
via nmkadda

0 Response to "राष्ट्रीय शिक्षण दिवस का साजरा केला जातो? काय आहे महत्व? जाणून घ्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel