TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

करोना प्रादुर्भावामुळे अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट Rojgar News

Effect of Corona: जगातील दर्जेदार शिक्षणासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी भारतातून अमेरिकेत जात असतात. भारतासोबतच जगभरातून दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेत जातात. मात्र, यावेळेस केरोना प्रादुर्भावाचा परिणाम या भागावरही दिसू लागला आहे. २०२०-२१ मध्ये भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी घट झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशनचा अहवाल सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याचे म्हटले आहे. मात्र, या घटत्या संख्येनंतरही अमेरिकेत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंती कायम आहे. अमेरिकेत येणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या चीनमधून आहे. तर दुसरी मोठी संख्या भारतीय विद्यार्थ्यांची आहे. २० टक्के भारतीय विद्यार्थी २०२०-२१ मध्ये अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याच वेळी, अमेरिकेत पोहोचलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येत १५ टक्क्यांनी घट झाली आहे. १९४८ मध्ये संस्थेतर्फे आकडेवारीचे प्रकाशन सुरू केल्यानंतर ही सर्वात मोठी घसरण होती. यूएसमध्ये एकूण परदेशी विद्यार्थ्यांची संख्या ९ लाख १४ हजारपेक्षा जास्त आहे. यापैकी एकूण भारतीय विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६७ हजार ५८२ म्हणजेच साधारण २० टक्के आहे. ६२ हजार विद्यार्थ्यांना व्हिसा नवी दिल्लीतील यूएस दूतावासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवाल जाहीर केला आहे. या आकडेवारीनुसार उन्हाळ्याच्या हंगामात एकूण ६२ हजार विद्यार्थ्यांना व्हिसा जाहीर करण्यात आला. ही संख्या मागील वर्षांमध्ये जाहीर केलेल्या व्हिसांपेक्षा खूप जास्त आहे. गेल्या वर्षीपेक्षा कमी विद्यार्थी भारतातून अमेरिकेत गेले. करोनाच्या साथीमुळे विद्यार्थी अमेरिकेला जाण्यास कचरत आहेत. दरम्यान जाहीर केलेल्या व्हिसाच्या संख्येवरून असे दिसून येते की शिक्षणासाठी अमेरिका हीच अजूनही विद्यार्थ्यांची पहिली पसंती आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी यूएसए, यूके, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये अभ्यासासाठी जातात. दरम्यान सर्वाधिक भारतीय विद्यार्थ्यांची पसंती अमेरिकेलाच आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास जसजसा वाढेल तसतशी विद्यार्थ्यांची संख्याही वाढेल, अशी अपेक्षा संस्था आणि अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qGwTpj
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या