शिक्षणाच्या प्रत्येक अतिरिक्त वर्षामुळे ६ टक्क्यांनी वाढते उत्पन्न! Rojgar News

शिक्षणाच्या प्रत्येक अतिरिक्त वर्षामुळे ६ टक्क्यांनी वाढते उत्पन्न! Rojgar News

आपण जितकं अतिरिक्त घेतो, तितकं आपलं उत्पन्न वाढतं, असं सांगणारा एक सोमवारी प्रसिद्ध झाला आहे. आपण भारतात शिकतो ते शिक्षणाचे प्रत्येक अतिरिक्त वर्ष आपलं उत्पन्न सरासरी ६.७ टक्क्यांनी वाढवतं, असं हा अहवाल सांगतो. विशेष म्हणजे उत्पन्नाचं हे प्रमाण मुलांच्या तुलनेत मुलींच्या बाबतीत अधिक आर्थिक परतावा देणारं असतं, असंही या अभ्यासात म्हटलं आहे. पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडिया ()या स्वयंसेवी संस्थेने हे संशोधन केलं आहे. सरकारला तरुणांचे आरोग्य, शिक्षण आणि एकूणच कल्याणासाठी गुंतवणूक करण्याची का आवश्यकता आहे, हा या अभ्यासाचा मूळ विषय होता. या अभ्यासात आढळून आलेल्या माहितीच्या विश्लेषणाद्वारे असा निष्कर्ष निघाला की शिक्षणाच्या प्रत्येक अतिरिक्त वर्षामुळे व्यक्तीचं सरासरी उत्पन्न ६.७ टक्क्यांनी वाढतं. हा आर्थिक परतावा मुलींना मुलांच्या तुलनेत अधिक मिळतो. मुलांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रत्येत अतिरिक्त वर्षामुळे उत्पन्नात सरासरी ६.१ टक्क्यांची वाढ होते, तर मुलींच्या शिक्षणाच्या प्रत्येत अतिरिक्त वर्षामुळे उत्पन्नात सरासरी ८.६ टक्क्यांची वाढ होते, असे हा अहवाल सांगतो. शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी खर्च केलेला प्रत्येक रुपया भविष्यात त्या व्यक्तीला ४.५ आणि ८.२ रुपयांदरम्यानचा लाभ मिळवून देतो, असा हा अभ्यास दर्शवतो. देशातील किशोरवयीन मुलांच्या बौद्धिक आरोग्याच्या सुविधांवर पुढील सहा वर्षांत ८,१३४ कोटी इतका खर्च अपेक्षित असल्याचे हा अहवाल सांगतो. तर शाळेत जाणाऱ्या तसेच शाळाबाह्य असणाऱ्या किशोरवयीन मुलामुलींच्या आयर्न आणि फॉलिक अॅसिड गोळ्यांवरील खर्च वार्षिक तीन हजार कोटींच्या घरात असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक पूनम मुत्रेजा यांनी किशोरवयीन विकासाच्या दिशेने काम करण्यासाठी सरकार आणि नागरी समाज संस्था यांच्या विविध अंगांनी एकत्रितपणे कृती करण्याची गरज व्यक्त केली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wPX2Db
via nmkadda

0 Response to "शिक्षणाच्या प्रत्येक अतिरिक्त वर्षामुळे ६ टक्क्यांनी वाढते उत्पन्न! Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel