TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये भरती, परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी Rojgar News

BHEL GDMO Recruitment 2021: (BHEL) मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. भेलमध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून त्यासाठी नोटिफिकेशन जाहिर करण्यात आले आहे. या पदभरती अंतर्गत जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO) च्या २८ पदांची भरती केली जाणार आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अनुभव यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) द्वारे प्रसिद्ध केलेल्या या रिक्त पदासाठी () अर्ज करण्याची प्रक्रिया ५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. २५ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट hwr.bhel.com वरील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या रिक्त पदांद्वारे (BHEL GDMO Recruitment 2021), जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO) च्या २८ पदांची भरती केली जाईल. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट hwr.bhel.com वर क्लिक करून देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज सुरू होण्याची तारीख – ५ नोव्हेंबर २०२१ अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ नोव्हेंबर २०२१ पात्रता या पदांसाठी (BHEL GDMO Recruitment 2021) अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा असणे गरजेचे आहे. राज्य वैद्यकीय परिषदेकडे उमेदवाराची नोंदणी असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया ऑनलाइन अर्जात दिलेल्या गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यानुसार शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी तयार केली जाईल. ही यादी संबंधित उमेदवारांना ईमेलवर पाठवली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ooBREy
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या