School Reopen: पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होण्यास अडचण नाही- आरोग्यमंत्री Rojgar News

School Reopen: पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होण्यास अडचण नाही- आरोग्यमंत्री Rojgar News

School Reopen: राज्यात पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होण्यात कोणतीच अडचण नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. असे असले तरी मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. दिवाळीनंतर राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु होणार असे म्हटले जात होते. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. पहिली ते चौथी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांमधून करोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेतली जाईल. करोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करुन वर्ग सुरु केले जावे असे चाईल्ड टास्क फोर्सने म्हटले आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे. राज्यातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शाळेमध्ये बोलावण्यात आले नाही. राज्य मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्स यांची चर्चा झाल्यानंतर शालेय शिक्षण विभाग पहिलीपासून वर्ग सुरु करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे. दरम्यान राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी हा निर्णय राहीला असून यानंतर शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा असेल असे सांगण्यात आले. शिक्षणविभागाच्या निर्णयानुसार, ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. शहरी भागांमधील या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास परवानगी नाही. दरम्यान राज्यातील करोना रुग्णांचे प्रमाण कमी व्हायला लागल्यानंतर राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यातील करोना संख्येचे प्रमाण आटोक्यात येताना दिसत आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी लोकल सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील पहिली ते चौथीच्या सर्व शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भा टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे. दिल्लीतील शाळा सध्या बंदच हवेच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली एनसीआर भागातील शाळा, महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (Commission for Air Quality Management, CAQM)सर्व शाळा, कॉलेजांना तूर्त ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी शाळा १३ नोव्हेंबर पासून आठवडाभर बंद ठेवण्याची घोषणा दिल्ली सरकारने केली होती. मात्र प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याने, पुढील आदेशापर्यंत राज्यभरातल्या सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला. सर्व शाळा, महाविद्यालयांचे वर्ग या कालावधीत ऑनलाइन सुरू राहणार आहेत. दिल्ली सरकारने वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर योजलेल्या उपाययोजनांमध्ये शाळा, कॉलेज बंद ठेवणे या पर्यायाचा समावेश आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HSy2Ag
via nmkadda

0 Response to "School Reopen: पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होण्यास अडचण नाही- आरोग्यमंत्री Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel