Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १३, २०२१ WIB
Last Updated 2021-11-13T06:44:31Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SSC MTS २०२१ परीक्षा पेपर १ ची उत्तरतालिका जाहीर Rojgar News

Advertisement
Answer Key: एसएससी एमटीएस परीक्षा पेपर १ ची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. कर्मचारी निवड आयोग ( Staff Selection Commission (SSC) ने आपली अधिकृत वेबसाइट सोबत ssc.nic.in वर मल्टीटास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ टियर १ परीक्षा २०२० ची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर केली आहे. यासोबतच रिस्पॉन्स शीट देखील जाहीर केली आहे. एमटीएस परीक्षेत सहभागी होणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटवर तपशील भरुन आपले मार्क्स तपासू शकतात. यासोबतच बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवरुन उत्तरतालिका डाऊनलोड करता येऊ शकते. SSC MTS 2021 :अशी करा डाऊनलोड एसएससीची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा. होमपेजवर 'मल्टी टास्किंग (Non-technical) स्कीम परीक्षा - २०२० ची कॉम्प्युटर आधारित परीक्षेची संभाव्य उत्तरतालिका अपलोड' वर क्लिक करा. उत्तरतालिका आणि शुल्क जमा करण्यासाठी https://ift.tt/2MjMZTH या लिंकवर क्लिक करा. उमेदवारांनी परीक्षेवेळी वापरलेला यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. स्क्रीनवर उत्तरतालिका दिसेल. आता त्याची प्रिंट घ्या आणि तुमच्या कॉम्प्युटरवर सेव्ह करा. त्यानंतर तुम्ही त्याच मॉड्यूलचा वापर करून उत्तरपत्रिकेवर आक्षेपही नोंदवू शकता.तसेच त्याची प्रिंट देखील घेऊ शकता. एसएससी एमटीएस परीक्षा २०२० ची उत्तरपत्रिका तपासताना चुकीच्या उत्तरावर आक्षेप नोंदणिण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. शेवटची तारीख संपल्यानंतर कोणताही फॉर्म स्वीकारला जाणार नाही. एसएससी एमटीएस संगणक आधारित परीक्षा १० ऑक्टोबर २०२० ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31LWzGH
via nmkadda