UPSC Recruitment 2021: यूपीएससीची फॅकल्टी पदांसाठी भरती Rojgar News

UPSC Recruitment 2021: यूपीएससीची फॅकल्टी पदांसाठी भरती Rojgar News

Recruitment 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग, यूपीएससीने (Union Public Service Commission,UPSC) ने फॅकल्टीच्या विविध पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या अंतर्गत असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, सीनियर असिस्टंट कंट्रोलरच्या पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. एकूण ३६ पदे भरली जाणार आहेत. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, ते यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २ डिसेंबर २०२१ आहे. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की अखेरच्या मुदतीआधी अर्ज जमा करावे, अखेरची मुदत निघून गेल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्जातली माहिती चुकीची असल्याचे आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. अर्जदाद विविध पदांशी संबंधित शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशनमध्ये पाहू शकतात. UPSC Recruitment 2021: महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन नोटिफिकेशन जारी होण्याची तारीख : १३ नोव्हेंबर २०२१ ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत : २ डिसेंबर २०२१ पदांची माहिती प्रोफेसर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग- १ पद असोसिएट प्रोफेसर इलेक्ट्रानिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीअरिंग- ३ पदे असिस्टंट प्रोफेसर कॉम्प्युटर इंजिनीअरिंग- ७ पदे जॉइंट असिस्टंट डायरेक्टर- ३ पदे डेप्युटी डायरेक्टर- ६ पदे सीनियर असिस्टंट कंट्रोलर ऑफ माइन इन इंडियन ब्युरो ऑफ माइंस- ८ पदे अर्जाचे शुल्क फॅकल्टी पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २५ रुपये शुल्क भरावे लागेल. एसबीआयच्या कोणत्याही शाखेत रोख किंवा एसबीआय नेटबँकिंग सुविधेचा उपयोग करून शुल्क जमा करायचे आहे. अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / पीडब्ल्यूबीडी / महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यूपीएससी भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइला भेट देऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HirZF1
via nmkadda

0 Response to "UPSC Recruitment 2021: यूपीएससीची फॅकल्टी पदांसाठी भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel